
पुणे : पोटच्या मुलाला दोन वर्षे ठेवले 22 श्वानांसोबत कोंडून
पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhawa) परिसरात आई-वडिलांनीच (Parents) पोटच्या 11 वर्षांच्या मुलाला दोन वर्ष 22 श्वानासोबत (Dog) कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, दोन वर्षानंतर ज्यावेळी हा पीडित मुलागा बाहेर आल्यानंतर श्वानाप्रमाणे वागू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगा 22 श्वानांसोबत राहिल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली असून, पीडित मुलाला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. (Minor Kid Lockup With Street Dogs In Kondhwa)
हेही वाचा: VIDEO : आंध्रात समुद्राच्या लाटांमध्ये वाहत आला 'सोन्याचा रथ'
पीडित मुलगा आणि त्याचे पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्याच घरामध्ये 22 श्वानदेखील होती. कित्येक दिवसांपासून पीडित लहान मुलगा श्वानांच्या सहवासात राहत होता. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तसेच त्याचे वागणेदेखील श्वानांप्रमाणे झाली आहे. (Pune News)
हेही वाचा: "ट्रम्प ट्विटरवर परतल्यास..."; तर्कवितर्कांना एलॉन मस्कचं उत्तर
पीडित लहान मुलाची घरातून सुटका करणं खरोखर कठीण काम होतं. कारण खोलीतील सर्व श्वान ही भटकी होती. तसेच त्यांची नसबंदीदेखील झालेली नव्हती. त्यामुळे हे श्वास हिस्त्र रुप धारण करण्याची भीती होती. ज्यावेळी आम्ही मुलाची सुटका करण्यासाठी गेलो. त्यावेळी श्वानांनी सर्व खोलीमध्ये घाण केलेली होती. मुलाच्या पालकांनी श्वानांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का, याचा तपासदेखील केला जाणार आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.
सर्वप्रकारानंतर टारझन चित्रपटाची आठवण
दरम्यान, कोंढव्यातील ही घटना समोर आल्यानंतर काही वर्षांपूर्वी आलेल्या टारझन चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात वन्य प्राण्यांच्या सहवासात एक चिमूरडा लहानाचा मोठा झाल्याचे दाखवण्यात आला आहे. त्यामुळे त्याची वागणूकदेखील प्राण्यांप्रमाणेच होते. माणूस असूनही त्याच्या अंगी त्या प्राण्यांचेच गुण उतरतात. असाच काहीसा प्रकार पुण्यातील या घटनेतून समोर आला आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ श्वानांच्या सहवासात बंदिस्त राहिल्यामुळे हा मुलगादेखील आपण माणूस आहोत हेच विसरून गेला असून, त्याची वागणूकदेखील श्वानांप्रमाणेच झाली आहे.
Web Title: Pune Parents Kept Their Child Locked Up With 22 Dogs For Two Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..