पुणे : सहयोगी शेतीतून ताज्या भाज्या

शेतीचा आनंद घेण्यासाठी मृदगंध स्टार्टअपची निर्मिती
fresh vegetables
fresh vegetables sakal

पुणे : शहर परिसरात शेती करणे प्रत्येकालाच शक्य नाही. मात्र शेती करण्याची आवड आहे. तसेच स्वतःच्या हाताने भाजीपाला पिकवून तो खाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ‘मृदगंध’ या स्टार्टअपने भन्नाट संकल्पना तयार केली आहे. काढणीस आलेला भाजीपाला नागरिकांना घरी नेता यावा, शेतीचा आनंद घेता यावा, अशी या स्टार्टअपची संकल्पना आहे.

शहरातील रहिवाशांना शेतकऱ्यांचे कष्ट समजावेत, पीक लागवडीपासून काढणीपर्यंत काय अडचणी असतात, त्यावर मात करून शेतकरी दर्जेदार उत्पादन आपल्यापर्यंत पोचवितो याची जाणीव आणि अन्नधान्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने पल्लवी पेठकर आणि अभिजित ताम्हाणे यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मृदगंध या स्टार्टअपची सुरवात केली.

fresh vegetables
प्रोत्साहन देण्यापेक्षा समाज आमच्यावर दया दाखवतो - राधेय पिल्ले

सहयोगी शेतकऱ्यांनी काय करावे?

शनिवार, रविवार किंवा त्यांच्या वेळेनुसार मृदगंधमध्ये येऊन प्लॉटमधील सऱ्या, गादीवाफ्यांची मशागत करावी. शेतात शेणखत, गांडूळखत मिसळावे. स्वतःच्या हाताने भाजीपाला बियाणे, रोपांची लागवड करावी, मातीची भर द्यावी, झारीने पाणी घालावे. पीक उत्पादनाचा आनंद मिळावा, दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी होण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. स्वतःच्या हाताने लावलेले भाजीपाल्याचे रोप जेव्हा भरभरून उत्पादन देते, तेव्हा तो आनंद पैशात मोजता येत नाही. मुलांना प्रत्यक्षात भाजी कशी उगवते, त्यामागे काय पद्धती, किती वेळ लागतो हे प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळते. महत्त्वाचे म्हणजे या काळात त्यांना मोबाईलची आठवण येत नाही.

- अमृता विशाल गुरव, मृदगंधचे सहयोगी शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com