

Pune Municipal Tender Controversy
Sakal
पुणे : महापालिकेच्या अर्थसंकल्पातील नगरसेवकांनी सुचविलेली कामे ‘स’ यादीतून केली जातात. पण आता नगरसेवकांनीकडून थेट प्रशासनाने सुचविलेल्या कामांवर ताबा घेतला जात आहे. त्यासाठी मर्जीतील ठेकेदारांनाच कामे द्यावीत यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील १० लाखापर्यंतची कामे मिळावीत यासाठी प्रशासनावर दबाव टाकला जात आहे. तसेच अन्य ठेकेदारांना निविदा मागे घेण्यासाठी दादागिरी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे.