पीएमपीच्या नव्या अध्यक्षांकडे आहेत चार, मोठ्या पदव्या!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 16 जानेवारी 2020

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 16 अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने गुरुवारी बदल्या केल्या. त्यात रायगडचे जिल्हाधिकासुर्यवंशी यांची पुण्यात पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे : रायगडच्या जिल्हाधिकारीपदी कोण असेल? किंवा जिल्हाधिकारीपदाची सूत्रे कोणाकडे द्यायची?, हे राज्य सरकारने अद्याप निश्चित केलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी पीएमपीची सूत्रे कधी स्वीकारणार, याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे एक दोन नव्हे, तर चार मोठ्या पदव्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उच्च विद्याविभूषित डॉ. सूर्यवंशी
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 16 अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने गुरुवारी बदल्या केल्या. त्यात रायगडचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांची पुण्यात पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत नियुक्ती री डॉ. करण्यात आली आहे. डॉ. सूर्यवंशी उच्च विद्याविभूषित आहेत. मॅनेजमेंटमध्ये त्यांनी "पीएचडी' केली आहे तर, मार्केटिंगमध्ये "एमबीए' केले आहे. तसेच "बीएससी' फिजिक्स् केले असून, "एलएलबी'ची पदवीही मिळविली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2011च्या बॅचचे 'आयएएस'
मूळचे नाशिकचे असलेले डॉ. सूर्यवंशी 1994 मध्ये राज्य सरकारच्या सेवेत दाखल झाले तर, 2011 मध्ये ते "आयएएस' झाले. गतसरकारमध्ये संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे ते स्वीय सहायक होते. या पूर्वी त्यांनी गोंदीया, कोल्हापूर, पालघर आदी जिल्ह्यांत तसेच "एमआयडी'मध्येही विविध पदांवर कार्यकाळ पूर्ण केला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे कोणाकडे द्यायची, हे अद्याप निश्चिडत झालेले नसल्याने ते पुण्यात पीएमपीची सूत्रे कधी स्वीकारणार, या बाबतही अनिश्चिततता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune pmp new president has four educational degrees