

The allegations are claims made on the floor of the civic body, and an official investigation or conclusion has not yet been announced.
Sakal
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) मधील पदोन्नती प्रक्रियेत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा शुक्रवारी (ता.२४) महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. नगरसेवक प्रशांत जगताप यांनी सभागृहातच विविध पदांसाठी कथितपणे आकारण्यात आलेल्या रकमेचे ‘रेटकार्ड’ वाचून दाखवत प्रशासनावर गंभीर आरोप केले. प्रत्येक पदासाठी लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण यादीच सभागृहासमोर मांडल्याने एकच खळबळ उडाली.