Video : पुणे पोलिसांचा भरोसा व सेवा उपक्रम राज्यभर राबवा - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

  • खासदार सुप्रिया सुळे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी 

पुणे : पुणे पोलिसांचे काम उत्कृष्ट आहे. त्यांच्याकडून राबविले जाणारे विविध उपक्रम लोकांना फायदेशीर ठरत आहेत. विशेषतः भरोसा सेल व सेवा या उपक्रमांचा नागरीकांना सर्वाधिक फायदा होत आहे. त्यामुळे हे दोन्ही उपक्रम राज्यभर राबावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेल व सेवा या दोन्ही उपक्रमांची माहिती घेण्यासाठी खासदार सुळे मंगळवारी दुपारी बारा वाजता पोलिस आयुक्तालयामध्ये आल्या होत्या. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के.वेंकटशेम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वप्ना गोरे, संभाजी कदम आदी उपस्थित होते.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

सुळे म्हणाल्या, पुणे पोलिसांकडून सातत्याने नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले जात आहेत.महिला, बालके व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांचा भरोसा सेल व त्याअंतर्गत येणारा जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक महिलांसह वृद्धांनाही या उपक्रमामुळे आधार मिळाला आहे. तर सेवा उपक्रमाद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण केले जात आहे.या उपक्रमामुंळे नागरीकांचा पोलिसांवरील विश्‍वास वाढला आहे.''


..कॉल क्रमांक दोन लाख..सुप्रिया सुळे यांनी साधला संवाद ! 
सेवा उपक्रम सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत दोन लाख 34 हजार 543 नागरीकांनी पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या. त्यापैकी एक लाख 99 हजार 98 जणांशी आत्तापर्यंत सेवा कार्यक्रमाणीद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडून प्रतिसाद घेण्यात आला.

दिल्लीतील शाळांना मेलेनिया ट्रम्प यांनी दिली भेट; म्हणाल्या...

दरम्यान, मंगळवारी खासदार सुळे यांनी एक लाख 99 हजार 99 वा कॉल हसन अली यांना केला, तर दोन लाख क्रमांकाचा कॉल उदय माने यांना केला. अली यांनी त्यांचे पासपोर्टचे काम झाल्याचे सांगितले, तर माने यांनी पोलिसांनी त्यांचा गुन्हा दाखल केला असून सध्या तपास सुरू असल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police activities carried out across the state says Supriya Sule