Pune : पोलिस हवालदाराची २५ हजारांनी फसवणूक; मुलाची चूक पडली भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

पोलिस हवालदाराची २५ हजारांनी फसवणूक; मुलाची चूक पडली भारी

पुणे : वडिलांच्या स्मार्टफोनवर गेम खेळण्यात मग्न असलेल्या पोलिस हवालदाराच्या नऊ वर्षांच्या मुलाने अज्ञात कॉलरच्या सूचनांचे पालन केले. यामुळे पोलिस हवालदार असलेल्या वडिलांना २५,००० हजारांचे (online Fraud) नुकसान झाले. त्यांच्या बँक खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस आल्यानंतर फसवणूक झाल्याचे समजले. या घटनेनंतर कॉन्स्टेबलने सायबर क्राइम सेलकडे तक्रार अर्ज दाखल केला.

चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी एका वृत्तवाहिनेला सांगितले की, १४ फेब्रुवारी रोजी कॉन्स्टेबल घरी होते. यावेळी त्यांच्या मुलाने गेम खेळण्यासाठी स्मार्टफोन घेतला. यावेळी अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मुलाने अनोळखी व्यक्तीच्या कॉलला उत्तर दिले. ज्याने त्याला पॅन कार्ड अपडेट करण्याचा आग्रह केला अन्यथा ते रद्द होऊ शकते, असे सांगितले.

हेही वाचा: नितीन गडकरी हे रस्त्यांचे जाळे विणणारे ‘स्पायडरमॅन’; सरकारचे कौतुक

यानंतर अनोळखी व्यक्तीने मुलाला पाठवलेली लिंक उघडण्यास सांगितले व बँक खात्याचे तपशील भरण्यास सांगितले. यानंतर आलेला ओटीपी सांगण्यास सांगितले. मुलाने ओटीपी शेअर करताच वडिलांच्या बँक खात्यातून २५,००० रुपये डेबिट (online Fraud) झाले, असे वसंत बाबर यांनी सांगितले. चिखली पोलिसात भारतीय दंड संहिताचे (आयपीसी) कलम ४२० (फसवणूक) आणि माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीचे प्रमाण वाढले

ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे रोज उघडकीस येणाऱ्या प्रकरणावरून दिसून येत आहे. मात्र, यापासून नागरिक कोणताही धडा घेत नसल्याचे स्पष्ट होते. पुण्यात मुलाच्या चुकीने पोलिस हवालदाराची फसवणूक झाली. यामुळे मुलांच्या हाती मोबाईल द्यावा की नाही, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, फोन आला तेव्हा वडिलांकडे फोन असता तर फसवणूक होण्याची शक्यता कमी असती.

Web Title: Pune Police Constable Cheated By 25000 The Boy Made A Big Mistake Crime News Online Fraud

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top