नितीन गडकरी हे रस्त्यांचे जाळे विणणारे ‘स्पायडरमॅन’; सरकारचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

नितीन गडकरी हे रस्त्यांचे जाळे विणणारे ‘स्पायडरमॅन’; सरकारचे कौतुक

रस्ते सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची आणि अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी लोकसभेत केली. त्याचवेळी भाजपचे खासदार तापीर गाव यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना देशात रस्त्यांचे जाळे विणणारे ‘स्पायडरमॅन’ म्हणत रस्तेबांधणीसाठी सरकारचे कौतुक केले.

लोकसभेत ‘२०२२-२३ या वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागण्या’ या विषयावर चर्चा सुरू झाली. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा अमरावती आणि हैदराबादमधील रस्ते संपर्क वाढवण्यावर भर देतो. अशा परिस्थितीत यात काय प्रगती झाली, हे सरकारने सांगावे, असा प्रश्न वायएसआर काँग्रेस पक्षाचे एम भरत यांनी केला.

हेही वाचा: डिझेलच्या दरात २५ रुपयांनी वाढ; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

रस्ते बांधणीत पूर्वीच्या काँग्रेस सरकारने केलेल्या कामामुळे आज भारत रस्त्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेत जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, भारत ४४ व्या क्रमांकावर आहे. सरकार रस्त्यांच्या दर्जाकडे पूर्ण लक्ष देत नाही. रस्ता सुरक्षेसाठी वाटप केलेल्या बजेटपैकी फक्त दोन टक्के खर्च केला जातो, तर अमेरिकेत बजेटच्या सहा टक्के खर्च केला जातो, असे काँग्रेसचे (Congress) एमके विष्णू प्रसाद म्हणाले.

मी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना ‘स्पायडरमॅन’ असे नाव दिले आहे. कारण, त्यांनी रस्त्यांचे जाळे विणले आहे. मोदी सरकार आल्यानंतर चीनच्या सीमेजवळ रस्ते बांधणीचे काम वेगाने सुरू आहे, असे चर्चेत भाग घेताना भाजपचे तापीर गाव म्हणाले. आपल्या राज्यातील अनेक रस्त्यांच्या बांधकामाचा संदर्भ देत अरुणाचल प्रदेशचे लोकसभा सदस्य म्हणाले, मोदी है तो मुमकीन है, गडकरी है तो मुमकीन है. मला आशा आहे की ‘स्पायडरमॅन’ ज्या गतीने रस्ते बांधत आहे (Road construction) त्याच गतीने पुढे जात राहील.

हेही वाचा: बलात्कारानंतर मुलीचे डोळे काढले; नग्नावस्थेत मृतदेह नाल्यात फेकला

मंत्रालयाने अधिक प्रभावी पावले उचलावी

मुरादाबादमधून जाणाऱ्या काही महामार्गांच्या अपूर्ण (Road construction) कामांचा संदर्भ देत समाजवादी पक्षाचे एसटी हसन म्हणाले की, रस्ते वाहतूक मंत्रालयाने याकडे लक्ष द्यावे. चर्चेत भाग घेताना जनता दलचे (युनायटेड) चंदेश्वर प्रसाद म्हणाले की, रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंमुळे देशाचे जीडीपीच्या तीन टक्के नुकसान होते. अपघात रोखण्यासाठी मंत्रालयाने अधिक प्रभावी पावले उचलावीत.

Web Title: Central Minister Nitin Gadkari Road Development Road Construction Appreciation Of The Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..