Pune Crime: सोशल मीडियावरील 'कोयता गॅंग' पोलिसांच्या रडारवर; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

सोशल मीडियावर स्टेटस ठेवणे पडलं महागात
pune crime
pune crimeesakal

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. शहरात कोयता गॅंगने मोठी दहशद निर्माण केली आहे. रोज कोठे ना कोठे कोयता गॅंगची घटना समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सावध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

pune crime
मविआमध्ये सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठ विधान; म्हणाले, लवकरच...

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाने सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन स्टेटस ठेवल्याने ९ तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील लोणी काळभोर, हडपसर आणि अन्य भागातील अशा नऊ तरुणांवर हत्यार बंदी काय अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही सगळी तरुण मंडळी काही दिवसांपासून फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हातात हत्यार म्हणजेच कोयता घेऊन व्हिडिओ काढून प्रसारित करत होते.

pune crime
Abu Azmi Threat Call : औरंगजेबच्या विरोधात चुकीचं ऐकणार नाही; धमकीनंतर अबू आझमी म्हणाले...

पोलिसांनी काही दिवसांपूर्वी समाजात तेढ निर्माण करणारे स्टेटस सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असे सांगितले होते. त्यानंतर समोर आलेल्या व्हिडीओ, फोटोंचा आधार घेत मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांची नावे,

तेजस संजय बधे (वय १९ रा. बोडके वस्ती, थेऊर, पुणे), उदय सिद्धार्थ कांबळे ( वय १९ रा. भिल्ल वस्ती, थेऊर, पुणे), प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय १९ रा. सखाराम नगर, थेऊर, पुणे), रोहित राजू जाधव (वय २० वर्षे रा. लोणीकाळभोर, पुणे), संग्राम भगवान थोरात (वय २८ रा. चांदणी वस्ती पुणे), श्याम गुरप्पा जाधव (वय ४३ रा. शेवकर वस्ती, वानवडी) तसेच आणखी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. असे एकूण ९ मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com