
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अन्यायानंतर पुण्यात राहण्यासाठी आलेल्या महिलेला तीन तरुणींनी आश्रय दिला. त्या तीन तरुणींना पोलिसांनी पुण्यात चौकशीवेळी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप पीडितेसह तरुणींनी केलाय. आता या प्रकरणी तरुणींनी मबिला पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. मात्र त्यांचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. तीन तरुणींना मारहाण प्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही असं पत्रच पोलिसांनी दिलं आहे. तरुणी रविवारी सकाळपासून सोमवारी पहाटेपर्यंत पोलीस ठाण्यातच आंदोलन करत होत्या. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल करता येणार नाही असं पत्र देण्यात आलं आहे.