esakal | ...अन् तरीही रक्तदान करत पोलिस पुन्हा एकदा समाजासाठी धावून आले!
sakal

बोलून बातमी शोधा

Police_Blood_Donation

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या तरुण पोलिसांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

...अन् तरीही रक्तदान करत पोलिस पुन्हा एकदा समाजासाठी धावून आले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिस 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' असे आपले बिरुद सार्थ ठरवित स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलिस कोरोनाविरुद्ध नागरीकांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले. कधी दोन फटके मारून, तर कधी मायेने दोन घास भरवित त्यांनी प्रत्येकाला या कठिण प्रसंगात साथ दिली. पण, कोरोनाने त्यांनाच गाठले, त्यात 30 पोलिसांचा मृत्यू झाला. तरीही ते कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. आता तर तेच संवेदनशील पोलिस कोरोनाबाधीत रुग्णांसाठी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावत असल्याचे शुक्रवारी (ता.१२) दिसले.

 - 'पोलिसांच्या कामाचा राज्याला अभिमान'; उपमुख्यमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुक!

मागील काही महिन्यात राज्यातील दोन हजारांहुन अधिक पोलिसांना कोरोनाने गाठले. त्यामध्ये आपल्याच सहकाऱ्यांना जीव गमवावा लागल्याची वेदना पोलिसांच्या मनात असतानाही त्यांच्यातील समाजाप्रती असलेली संवेदनशीलता कमी झाली नाही. राज्यात कोरोनाबाधीतांना रक्ताची भासणारी गरज लक्षात घेऊन पुणे पोलिस दलातील 2012 च्या तुकडीतील 55 जणांनी शुक्रवारी रक्तदान केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या तरुण पोलिसांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 

- इंजिनिअर तरुणाने शेतीचा नाद केला, लॉकडाउनमध्ये कमावले 13 लाख

पोलिसांच्या रक्तदान शिबीराला भेट दिल्यानंतर पवार यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोना नियंत्रणासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजना जाणून घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरीक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, अशोक मोराळे, सुनील फुलारी यांच्यासह सर्व पोलिस उपायुक्त उपस्थित होते. यावेळी पुणे पोलिसांनी लॉकडाऊनच्या कालावधीत केलेल्या चांगल्या कामगिरीवर आधारीत बनविलेल्या 'फिल द बीट' या पुस्तिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. 

- दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत राज्य शिक्षण मंडळाने दिले स्पष्टीकरण; निकालाच्या तारखा...!

पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करीत पवार म्हणाले, ''कोरोना नियंत्रणासाठी राज्यातील पोलिसांनी मागील तीन महिन्यांपासून आपल्यातील संवेदनशीलता दाखवून पोलिस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढेही शासनाच्या विविध आदेशांची अंमलबजावणी करुन कोरोनाला हरवुयात. पुणे पोलिसांनी माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उत्तम कामामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर वाढला आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणे कोरोनाच्या काळात पोलिसांनी केलेल्या कामाचा राज्याला अभिमान आहे'' तसेच त्यांनी पोलिसांना चांगली घरे मिळावीत, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डॉ. वेंकटेशम म्हणाले, ''पोलिसांनी लॉकडाऊन कालावधीत सोशल पोलिसींग, स्क्रिनिंग, प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवितानाच जनजागृती करण्यासही भर दिला. पोलिस शिपायापासूने ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी त्यामध्ये योगदान दिले आहे.'' डॉ.शिसवे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपायोजनांची दृकश्राव्य सादरीकरणातून माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image
go to top