
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणेंच्या मोठ्या सूनेचाही छळ झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी मयुरी हगवणे यांनी आपण महिला आयोगात तक्रार दिल्याचं सांगितलं होतं. आता महिला आयोगाने त्या पत्रानंतर पुढे काय झालं याची माहिती दिलीय. तसंच पोलिसांना कारवाईचे निर्देश दिल्यानंतर त्यांनी कारवाई केली नसल्याची गंभीर बाब समोर आल्याचं सांगितलंय. या सगळ्या प्रकाराची माहिती महिला आयोगाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे.