लॉकडाऊनमध्ये 'एवढ्या' ज्येष्ठ नागरीकांना पुणे पोलिसाचा मिळाला 'आधार'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

लॉकडाऊनमुळे कोणी औषधे आणून देत नाही. मला मदत करा". हा मेसेज वाचुन साठे यांनी पोलिस कर्मचाऱ्याना सूचना दिल्या. अनेक अडचणी पार केल्यानंतर औषधे मिळाली. पोलिसांनी सिन्हा यांना ही औषधे घरी नेऊन दिली, पोलिसांबद्दल कृतज्ञात व्यक्त करताना क्षणार्धात सिन्हा यांच्या डोळ्यातुन अश्रु तरळले ! अशा पद्धतीने पुणे पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात  तब्बल सव्वा पाचशेहुन वृद्ध नागरीकांना मदत करीत आधार दिला.

पुणे - हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांना एक मेसेज येतो, "मी निवृत्त लष्करी अधिकारी रीपुसुदान कुमार सिन्हा. मी कर्करोगाने ग्रस्त असून घरी एकटाच आहे. माझी औषधे संपली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊनमुळे कोणी औषधे आणून देत नाही. मला मदत करा". हा मेसेज वाचुन साठे यांनी पोलिस कर्मचाऱ्याना सूचना दिल्या. अनेक अडचणी पार केल्यानंतर औषधे मिळाली. पोलिसांनी सिन्हा यांना ही औषधे घरी नेऊन दिली, पोलिसांबद्दल कृतज्ञात व्यक्त करताना क्षणार्धात सिन्हा यांच्या डोळ्यातुन अश्रु तरळले ! अशा पद्धतीने पुणे पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात  तब्बल सव्वा पाचशेहुन वृद्ध नागरीकांना मदत करीत आधार दिला.

न्यायालयामध्ये गर्दी कमी होईना; जिल्हा न्यायाधीशांनी घेतला महत्वाचा निर्णय

पुणे शहर निवृत लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात 5 ते 6 लाख वृद्ध नागरीक वास्तव्य करतात. त्यामध्ये 5 ते 7 हजार एकाकी वृद्ध नागरीक आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच हजारो वृद्ध नागरीकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. अनेक नागरिकांना या वृद्ध नागरीकांना मदत करण्याची इच्छा असुनही केवळ शहरात संचार मनाई आदेश असल्याने त्यांनाही मर्यादा येत होत्या. 

पुण्यात घरेलू कामगारांवरून सोसायट्यांमध्ये सुरू झाले वाद; वाचा सविस्तर बातमी

कोणाची औषधे संपली, तर कोणाच्या घरी केअर टेकर येऊ शकत नसल्याने त्यांची तारांबळ होऊ लागली होती. काही एकाकी वृद्धाना जेवण मिळत नव्हते, तर काही जणांना नियमित औषधउपचार घेण्यासाठी रुग्णालयात जायचे होते. मात्र संचाए मनाई आदेशामुळे त्यांना त्यांची कामे करण्यास अनेक अडचणी येत होत्या. अशा संकटाच्या काळात वृद्ध नागरीकांनी थेट पोलिसांना संपर्क करुन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली.

विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

दरम्यान, वृद्ध नागरीकांना येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविन्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी दिले होते. त्यानुसार, पोलिसांच्या भरोसा सेल अंतर्गत येणारे  ज्येष्ठ नागरिक कक्ष व सर्व पोलिस ठाण्यात वृद्धाना मदत करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांकडे तब्बल 534 ज्येष्ठ नागरीकांनी संपर्क साधला. या सर्व गरजुना ज्येष्ठ नागरीक कक्षाने स्थानिक पोलिस ठाणे व सामाजिक संस्था यांच्या मदतीने सर्व प्रकारची मदत पोचविण्याचे काम केले. त्यामध्ये सर्वाधिक 73 जणानी जेवण व अन्नधान्यसाठी पोलिसांकडे संपर्क साधला. त्यापाठोपाठ 47 जणानी गैससाठी पोलिसांकडे संपर्क साधला.

"लॉकडाऊन काळात पोलिसांनी तब्बल 534 ज्येष्ठ नागरीकांशि संपर्क साधला. या सर्व गरजुना ज्येष्ठ नागरीक कक्षाच्या माध्यमातुन स्थानिक पोलिस ठाणे व सामाजिक संस्था यांच्या मदतीने सर्व प्रकारची मदत पोचविण्याचे काम केले." बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

मदतीचे कारण व ज्येष्ठ नागरीकांची संख्या
जेवण/ अन्नधान्य - 73
गैस पाहिजे - 47
मोलकरीण/ केअर टेकर - 14
औषधे - 27
हॉस्पिटल - 22
किराणा/ भाजीपाला - 35
पेंशन व बैंकेची कामे - 12
पोलिस पास - 35
वाहनाची सोय - 04
दूध - 04
अन्य कारणे - 262
एकुण मदत - 534 

ज्येष्ठ नागरीक हेल्पलाईनवर आलेल्या फोनची संख्या - 534

* ज्येष्ठांसाठी पुणे पोलिसांची हेल्पलाइन 
- ज्येष्ठ नागरिक कक्ष हेल्पलाइन - 1090 
- लॉकडाऊन काळात मदतीसाठी क्रमांक - 26111103

ज्येष्ठ नागरिकांची संख्या 
महाराष्ट्र - 1 कोटी 20 लाख 
पुणे शहर - 5 ते 6 लाखांहून अधिक 
शहरातील एकाकी ज्येष्ठ नागरिक - 5 ते 7 हजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police gets support for so many senior citizens in lockdown