कोल्हापुरच्या कुख्यात दरोडेखोर ज्वालासिंग टोळीच्या २ गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी केली अटक

Pune police have arrested two criminals from Jwala Singh gang in Kolhapur
Pune police have arrested two criminals from Jwala Singh gang in Kolhapur
Updated on

लोणी काळभोर (पुणे)- कोल्हापुर पोलिसांना मागील २९ वर्षांपासुन गुंगारा देणाऱ्या कुख्यात दरोडेखोर ज्वालासिंग याच्या टोळीमधील दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने शुक्रवारी (ता. २) रात्री उरुळी कांचन (ता. हवेली) येथुन अटक केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काळ्या उर्फ दामू बरोट्या नानावत उर्फ कंजारभट (वय ५९ रा. यवत इंदिरानगर ता.दौंड) व अरविंद उर्फ सेनीर रामलाल राजपूत  उर्फ कंजारभट वय ५८ रा.दत्तवाडी उरुळीकांचन ता.हवेली) ही त्या अट्टल गुन्हेगारांची नावे असुन, दोन्हीही गुन्हेगार चे सदस्य असुन, दोघांनाही कोल्हापुर पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. 

कोरोनामुक्त रुग्णांना उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा; शहरात सुरू होणार 'पोस्ट कोविड ओपीडी' सेंटर! 

कोल्हापुर जिल्हातील मुरबाड पोलिस ठाण्यात हद्दीत कुख्यात दरोडेखोर ज्वालासिंग याच्या टोळीने २९ वर्षापुर्वी दोन दरोडे टाकले होते. या गुन्हातील कांही आरोपी अटक करण्यात कोल्हापुर पोलिसांना यश आलेले असले तरी, काळ्या नानावत व अरविंद राजपूत हे दोघेजण पोलिसांना मागील २९ वर्षांपासुन गुंगारा देत होते.

दरम्यान काळ्या नानावत व अरविंद राजपूत हे दोन्ही फरारी आरोपी उरुळी कांचन व परिसरात फिरत असल्याची माहिती एका खबऱ्याने, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे महेश गायकवाड, निलेश कदम ,सुभाष राऊत, गुरू गायकवाड, विदयाधर  निचित, प्रमोद नवले यांनी उरुळी कांचन परीसरात साफळा रचला होता. या साफळ्यात वरील दोन्हीही अट्टल गुन्हेगार शुक्रवारी अलगत अडकले.

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com