Pune Crime : वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत, खासदार सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत वाढली असून गाड्या फोडणे, नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू आहेत.
mp Supriya Sule
mp Supriya Sulesakal

Pune Crime - पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

mp Supriya Sule
Pune : खळबळजनक! शुक्रवार पेठेतील सदनिकेत आढळले दांपत्याचे मृतदेह

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत वाढली असून गाड्या फोडणे, नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू आहेत. आजही वारजे परिसरात या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत सुळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली.

mp Supriya Sule
Mumbai : मुलाने वाढदिवसाला दिलेली भेट हरवली, एनएमएमटी वाहकाने वृद्धेला हरवलेले कर्णफूल केले परत

पुणे आणि परिसरात वाढलेल्या या गुन्हेगारीवर आळा घालणे अतिशय गरजेचे असून संघटीत गु्न्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com