
पुणे : राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासाळली असून याला प्रामुख्यानं पोलीस दल कारणीभूत असल्याचं विविध घडामोडींमधून स्पष्ट होत आहे. पुण्यात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळंही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच आता पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं दारुच्या नशेत जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या एका महिलेकडं शरिरसुखाची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा दावा केला असून यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. या प्रकारामुळं मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.