

Pune Police recruitment fake sports certificate case involving alleged misuse of the 5% sports quota by 19 candidates
esakal
पुणे शहर पोलिस दलातील भरती प्रक्रियेत खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत १९ उमेदवारांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘कुराश’ या पारंपरिक कुस्तीच्या खेळाचे तसेच ‘ड्रॅगनबोट’ या सामूहिक नौकानयनाच्या खेळाचे खोटे प्रमाणपत्र तयार करून ते भरती प्रक्रियेत सादर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.