esakal | Pune Crime | मित्रांनीच संगणक अभियंत्याच्या डोक्‍यात गोळी घालून केला खुन
sakal

बोलून बातमी शोधा

two arrested

मित्रांनीच संगणक अभियंत्याच्या डोक्‍यात गोळी घालून केला खुन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोंढवा बुद्रुक येथील उच्चभ्रु सोसायटीत संगणक अभियंत्याच्या खुनाच्या घटनेचा कोंढवा पोलिसांनी उलगडा केला आहे. घरात पार्टी सुरू असतानाच मित्रांनी संगणक अभियंत्याच्या डोक्‍यात पिस्तुलातुन गोळी घालून त्याचा खुन केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केले असून खुनाचे कारण अद्याप पुढे आले नाही. ही घटना सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

हेही वाचा: मुनमुन धामेचाचं नाव विनाकारण गोवण्यात आलं; वकिलांचा कोर्टात दावा

गणेश यशवंत तारळेकर (वय 47, रा. कोंढवा बुद्रुक) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. सागर दिलीप बिनावत (वय 33), दत्तात्रय देवीदास हजारे (वय 47, दोघेही रा. कोंढवा बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्फुर्ती तारळेकर (रा. पिसोळी ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तारळेकर हे कोंढवा बुद्रुक येथील एका उच्चभ्रु सोसायटीत राहात होते. पती गणेश यांच्यासमवेत असलेल्या कौटुंबिक वादामुळे फिर्यादी पत्नी व त्यांचा 14 वर्षांचा मुलगा मागील दिड वर्षापासून जवळच असलेल्या त्यांच्या माहेरी राहात आहेत. त्यामुळे तारळेकर हे एकटेच त्यांच्या घरात राहात होते. गणेश यांनी सोमवारी दिवसभर त्यांची सदनिका उघडली नाही, अशी माहिती कोंढवा पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तेव्हा, गणेश हे त्यांच्या सदनिकेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तसेच त्यांच्या डोक्‍याला पिस्तुलाची गोळी लागून त्यांचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यानंतर संबंधीत गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनेच्या दोन दिवस आगोदर तारळेकर यांनी सासऱ्यांना फोन करून आपण आत्महत्या करणार आहोत, अशी धमकी दिली होती. त्यामुळे संबंधीत घटना ही आत्महत्या असल्याचा पोलिसांना संशय होता.

हेही वाचा: अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

मात्र, गणेशने सोमवारी दुपारी त्याच्या दोन मित्रांना घरी बोलावून मद्यपानाची पार्टी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या कारणावरुन दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा, तारळेकर याने त्याच्याकडील पिस्तुलातुन स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यास वाचविताना गोळी सुटून तारळेकर यांचा मृत्यु झाल्याची कबुली दोघांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.

तारळेकरने दोन दिवसांपुर्वी सासऱ्यास फोन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यावरुन हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांना वाटले. मात्र चौकशीमध्ये दोघांनी खुन केल्याची माहिती दिली. पिस्तुलातुन गोळी सुटल्याने तारळेकरचा मृत्यु झाला, असे आरोपींचे म्हणणे आहे. मग आरोपींनी पिस्तुल नष्ट का केले, पोलिस किंवा त्यांच्या नातेवाईकांपासून ही घटना का लपविली ? पिस्तुल नेमके कोणाचे आहे आणि तारळेकर यांचा खुन करण्याचे नेमके कारण काय आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत.

loading image
go to top