
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे परप्रांतीय आणि राज्यातील मजुरांसह अनेकजण दीड महिना अडकून पडले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानंतर अशा कामगारांना प्रवासाला परवानगी देण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
त्यानुसार दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगाराना घरी परतण्याच्या कामात आता सुसूत्रता येणार आहे. संचारबंदीमुळे परप्रांतीय व राज्यातील मजुरांसह यात्रेकरु, विद्यार्थी, पर्यटक दीड महिना अडकून पडले आहेत. त्यांना माघारी जाण्याबाबत केंद्र सरकारने नुकतेच आदेश दिले आहेत.
त्यानुसार राज्याअंतर्गत व परराज्यात नागरिकांना परत जाता, यावे यासाठी पुणे पोलिस दलातील गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाकडून राज्यातील आणि परराज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी सामाजिक अंतर पाळणे आणि अन्य अटी व नियमांचे नागरीकांना पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच पररज्यात जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी माहिती भरुन घेण्यासाठी "मायग्रंट पासेस सेल", त्याद्वारे कामगारांचे त्यांच्या गटानुसार अर्ज भरुन घेणे, वैद्यकीय प्रमाणपत्र पाहणी, जमा झालेले पोलिस उपायुक्त यांच्याकडे पाठविणे, वाहने उपलब्ध करण्यासाठी मदत करणे या स्वरुपाच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अशी घ्यावी लागणार काळजी :
* सामाजिक अंतर ठेवावे.
* प्रवास करताना मास्क, सैनीटायझर वापरने बंधनकारक
* प्रत्यक्षात पोलिस ठाण्यात येणे टाळावे.
* covid19.mahapolice.in या वेबसाईटद्वारे अर्ज भरण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.