लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांना घरपोच मिळणार डिझेल; पुणे जिल्हा परिषदेचा 'डिझेल टू होम' उपक्रम!

Farmer-Diesel_To_Home
Farmer-Diesel_To_Home

पुणे : केवळ डिझेलअभावी शेतीच्या मशागतीची कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी शेतीच्या मशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना घरपोच डिझेल पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रविवारी (ता.३) भोर आणि वेल्हे तालुक्यात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

पुणे जिल्हा परिषद आणि भारत पेट्रोलियम कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यानुसार लॉकडाउनच्या कालावधीत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सर्व वाहनांना घरपोच डिझेल पुरवठा केला जाणार आहे. स्टार्टअप रेपॉस एनर्जी या कंपनीवर डिझेल वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- पुणे शहर पोलीस दलातील ते पोलिस दांपत्य झाले कोरोनामुक्त!
 
कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकोपानंतर कृषी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

या घरपोच डिझेल वितरण सेवेची सुरुवात आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे, भोरचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे, रेपॉस एनर्जीचे राजेंद्र वाळूंज, पूजा वाळूंज, निघूडघरच्या सरपंच बायडाबाई कंक, वठारचे सरपंच, संदीप ख़टापे आदी उपस्थित होते. 

लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी डिझेल मिळत नसल्याची तक्रार पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मोबाईलवरून केली होती. त्यामुळे शेती मशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या डिझेलचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com