esakal | लॉकडाउनमुळे अडकलेल्यांनो, घरी जायचं आहे ना? मग ही नियमावली वाचाच!
sakal

बोलून बातमी शोधा

Migrant_Workers

या माहितीमध्ये आधार क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, तसेच ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्थळ व ज्या वाहनाचा (कार, बस) स्पष्ट उल्लेख असावा.

लॉकडाउनमुळे अडकलेल्यांनो, घरी जायचं आहे ना? मग ही नियमावली वाचाच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (कन्टेन्मेंट झोन) बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीस येण्यास किंवा येथून बाहेर जाण्यास परवानगी नाही. तसेच, महापालिका आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा  निश्चित केल्याशिवाय वाहतूक सुरु करण्यात येऊ नये, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून इतर जिल्ह्यात जाण्याच्या परवानगीबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेण्यात यावा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यात आणि राज्यात अडकलेल्या कामगार, पर्यटक, विद्यार्थी, भाविक आणि इतर व्यक्तींना जिल्ह्यात येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केलेले आहे. परंतु जिल्ह्यात पोलिस आयुक्तालय असलेल्या ठिकाणच्या व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी माहिती तेथील पोलिस उपायुक्त एकत्रित करतील. या माहितीमध्ये आधार क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, तसेच ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्थळ व ज्या वाहनाचा (कार, बस) स्पष्ट उल्लेख असावा. गटाच्या बाबतीत ही माहिती एकत्र करुन गट प्रमुख अर्ज करु शकतील.

अशी असेल स्थलांतर प्रक्रिया  :

- शीतज्वर (एन्फलूएन्झा) सारखी लक्षणे नाहीत असे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व्यक्तीनिहाय आवश्यक. गटाच्या बाबतीत प्रपत्राप्रमाणे प्रमाणपत्र सादर करावे. 
- पोलिस उपायुक्त त्यांच्या परिक्षेत्रासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. 
- ई-पास सिस्टीम सध्या पोलिस वापरत आहेत, तीच वापरली जाईल.
http://covid19mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

-  जिल्हाधिकारी हे ज्या परराज्यातील, जिल्ह्यातील व्यक्ती त्यांच्या जिल्ह्यात अडकलेल्या आहेत त्याची यादी तयार करतील. ही यादी राज्यनिहाय, शक्यतो जिल्हानिहाय करण्यात यावी.

- लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांना घरपोच मिळणार डिझेल; पुणे जिल्हा परिषदेचा 'डिझेल टू होम' उपक्रम!

- ज्या जिल्हयात, राज्यात व्यक्तींना जायचे आहे तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून त्यांना पाठविण्यात यावे.
- ज्या राज्यात, जिल्ह्यात ते जाणार आहेत त्या राज्याने, जिल्ह्याने त्यांच्या स्वीकृतीची व्यवस्था केल्याची खात्री करावी. 
- ज्या व्यक्ती स्वत:ची वाहतूक व्यवस्था करून जाऊ इच्छितात त्यांच्याबाबत पाठविणा-या जिल्ह्याने समन्वय साधून त्यांना जाण्यासाठी परवानगी द्यावी.

- ज्या वाहनांनी ते जाणार आहेत त्या वाहनांवर लावण्यासाठी ट्रान्झिट पास / वाहन परवाना तयार करण्यात यावा. याच पासवर ते कोणत्या मार्गाने जाणार आहेत व त्या वाहनांमध्ये किती व्यक्ती प्रवास करणार आहेत, याचा स्पष्ट उल्लेख असावा.
- पोचण्याचे अंतिम ठिकाण निहाय राज्य, केंद्रशासित प्रदेश जिल्हानिहाय यादी तयार करून या प्राधिका-यांना पाठविण्यात यावी.
- वाहतुकीसाठी वापरण्यात येणा-या वाहनांचे वापरापूर्वी व वापरानंतर निर्जंतुकीकरण करुन घेण्यात यावे.
- संबंधित तहसिलदार हे तहसिल स्तरावर अशा लोकांची यादी तयार करतील,

- या यादीनुसार एका ठिकाणी गटाने लोक असल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्याचे प्रमाणपत्र घेतले जाईल. यादी करताना राज्य / जिल्हा / तालुकानिहाय अशा पध्दतीने करावी.
- जिल्हास्तरावर या बाबतीत एक संपर्क अधिकारी नेमण्यात यावा.
-  या व्यक्ती ज्या राज्यात किंवा ज्या ठिकाणी जाणार आहेत त्यांचा मार्ग योजना आराखडा करुन घेण्यात यावा. त्यानंतर त्यांच्या जिल्हाधिका-यांनी मान्यता द्यावी.
- प्रत्येक वाहनांसोबत ही कागदपत्रे आवश्यक
अ) वाहन परवाना ब) प्रवाशांची यादी क) प्रत्येक प्रवाशाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, गट समुहाचे नाव उल्लेखासह प्रमाणपत्र ड) प्रत्येक प्रवाशांचे बंधपत्र. सोबत बंधपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, वाहन प्रमाणपत्राचा नमुना जोडण्यात येत आहे.
-  शक्यतो या प्रवासादरम्यान प्रवाशांनी कमीत कमी ठिकाणी थांबणे अपेक्षित. अपवादात्मक परिस्थितीत मुक्काम करावयाचा असल्यास त्याची पूर्वकल्पना द्यावी.

- पुण्यात तयार केलं स्वदेशी बनावटीचं 'डिजिटल व्हेंटिलेटर'; आयसरमधील शास्त्रज्ञांनी केली निर्मिती!

राज्यांतर्गत, आंतरजिल्हा स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींसाठी सूचना :

- मालेगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर व इतर प्रतिबंधित क्षेत्रातून व्यक्तींना परवानगी देताना अतिशय काळजी घेण्यात यावी.
- ज्या व्यक्तीला परवानगी देण्यात येत आहे त्या व्यक्तीला शीतज्वर (एन्फलुएंझा) सारखे लक्षण नाही असे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायीक यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
-  जिल्हयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने परवानगी दिल्यानंतरच प्रवाशी वाहतूक सुरु होईल.

परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींबाबत सूचना : 

- इतर जिल्ह्यातून प्रवाशी आपल्या जिल्ह्यात येण्याची परवानगी मिळण्यासाठी आलेल्या पत्र व्यवहारांवर किंवा विनंतीवर कक्षामध्ये वेगळया कर्मचाऱ्यांमार्फत ही परवानगी देण्याची जबाबदारी देण्यात यावी.

- इतर जिल्हयातून किंवा राज्यातून येणाऱ्यांना 14 दिवसांसाठी गृह विलगीकरण किवा तपासणी अंती संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात येईल, याची पूर्व कल्पना द्यावी.

-  बाहेरची वाहने शहराच्या चेक पोस्टमध्ये आल्यानंतर त्या वाहनांचे बाह्य निर्जंतुकीकरण आणि पोचल्यानंतर अंतर्गत निर्जंतुकीकरण अत्यावश्यक राहील.

- येणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करुन त्या व्यक्तींना आवश्यकते प्रमाणे गृह विलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरणाचा सल्ला दिला जाईल.

Coronavirus : जिथून सुरुवात झाली तिथे होतोय शेवट

-  जिल्ह्यात प्रवेशाच्या ठिकाणी पोलिस, महसूल व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत थर्मल गन व इतर अनुषंगिक तपासणी करुन, गृह विलगीकरण / संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारावा. अशा व्यक्तींना गृह विलगीकरणाचे छापील पत्र देण्यात यावे. त्यांनी गृह विलगीकरणाचे उल्लंघन केल्यास उल्लंघनाच्या दिवसापासून पुढे 14 दिवस त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाईल याची त्यांना जाणीव करुन द्यावी.

- परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या रहिवाशांच्या बाबतीत त्या राज्यातून शीर्ष अधिकारी/ जिल्हाधिकारी यांच्याकडून यादी जोडपत्र व प्रमाणे परवानगी, वैद्यकीय प्रमाणपत्र, मार्गक्रमण योजना आराखडा, वाहनाची परवानगी, प्रवासाचा कालावधी व त्या वाहनात असले असलेल्याच व्यक्ती त्या वाहनात असल्याची खात्री करावी.

-  इतर राज्यातील व्यक्तींनी येतांना प्रतिबंधित क्षेत्र (Containment zone) आणि रेड झोनमधील जिल्ह्यामध्ये मुक्काम करू नये ही अट घालण्यात यावी. 

- राज्याअंतर्गत, राज्याबाहेर येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींनी मोबाईलमध्ये आरोग्य ॲप डाऊनलोड करुन घेणे बंधनकारक राहील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

loading image