पुण्यात तयार केलं स्वदेशी बनावटीचं 'डिजिटल व्हेंटिलेटर'; आयसरमधील शास्त्रज्ञांनी केली निर्मिती!

Digital_Ventilator
Digital_Ventilator

पुणे : अत्यवस्थ अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची आवश्‍यकता भासू शकते. रुग्णांची वाढती संख्या बघता पुरेशा संख्येत व्हेंटिलेटर उपलब्ध असणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून अत्यवस्थ अवस्थेमध्येही (क्रिटिकल कंडिशन) वापरता येईल, अशा डिजिटल व्हेंटिलेटरचे प्रारूप भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. 

जगभरामध्ये व्हेंटीलेटरचा तुटवडा भासत असल्यामुळे देशातही पर्यायी व्यवस्थांची चाचपणी केली जात आहे. देशभरातील विविध वैज्ञानिकांनी व्हेंटिलेटरच प्रारूप विकसित केले आहेत, पण यामधील बहुतेक व्हेंटिलेटर रुग्णाला क्रिटिकल कंडीशनमध्ये वापरणे शक्‍य होणार नाही. आयसरचे वैज्ञानिक प्रा. उमाकांत रापोल आणि प्रा. सुनील नायर यांनी विकसित केलेले डिजिटल व्हेंटिलेटर क्रिटिकल कंडीशनमध्ये वापरणे शक्‍य होणार आहे. पूर्णत: डिजिटल प्रारूपाचे हे व्हेंटिलेटर तीन मोडमध्ये वापरता येणे शक्‍य आहे. 

प्रा. रापोल म्हणाले, ''एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आम्ही व्हेंटीलेटरचे प्रारूप विकसित करायला सुरवात केली. क्रिटिकल कंडीशनमध्ये वापरात येणारी यंत्रसामग्री आणि कार्यान्वयन पद्धत आम्ही यात अंतर्भूत केली आहे. तयार झालेल्या प्रारुपामध्ये डॉक्‍टरांच्या परीक्षणानंतर आवश्‍यक ते बदल आम्ही करणार आहोत. त्यानंतर उत्पादनासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.'' आयसरचे तांत्रिक अधिकारी निलेश डूंबरे, माजी संशोधक डॉ. मोहम्मद नोमान, एम. साईनाथ यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे प्रा. नायर यांनी सांगितले.  

डिजिटल व्हेंटिलेटरच मोड : 

मेकॅनिकल व्हेंटीलेटरपेक्षा आधुनिक असलेले हे व्हेंटिलेटर तीन मोडमध्ये कार्यान्वित होते. 
1) कंटिन्यूअस पॉझिटीव्ह एअरवे प्रेशर :क्रिटिकल कंडीशनमधील रुग्णाला स्वतःहून श्‍वास घेता येत असेल तर या मोडचा वापर होतो. यामध्ये नाकाजवळील मास्कमध्ये योग्य प्रमाणात आणि दाबामध्ये ऑक्‍सिजन सातत्याने उपलब्ध केला जातो. 
2) मॅंडेटरी मोड किंवा फोर्स मोड :रुग्णाला स्वतःहून श्वास घेता येत नसल्यास, आवश्‍यक ऑक्‍सिजन आणि दाब यामध्ये उपलब्ध केला जातो. तसेच सलगपद्धतीने श्‍वास घेता येईल, अशी कार्यपद्धती यामध्ये वापरली जाते. 
3) असिस्टंट मोड :bरुग्णाला श्वासोच्छवासाच्या गतीच्या आधारावर आवश्‍यकता असल्यास योग्य पद्धतीने श्वासोच्छवासाला मदत करते. 
रुग्णासाठी एक प्रकारचा सहाय्यक म्हणून कार्य करते. 

डिजिटल व्हेंटिलेटरच वैशिष्ट्ये :

- पूर्णत:विद्युत ऊर्जेवर अवलंबून 
- आधुनिक सेन्सर आणि डिजिटल यंत्रसामग्रीचा वापर 
- रिमोटच्या साहाय्याने संचालन करता येते 
- एएमबीयू बॅगची आवश्‍यकता नाही 
- पूर्णत: स्वदेशी, स्थानिक उपलब्ध साहित्याचा वापर. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्‍य. 
- 50 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

डिजिटल व्हेंटिलेटरच फायदे :

- क्रिटिकल कंडीशनमध्ये वापरता येते 
- कोरोना बाधिताच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता, रिमोटने संचालन करता येईल 
- असिस्टंट मोडच्या साहाय्याने निगेटिव्ह प्रेशरसाठी उपयोग करता येईल 
- किफायतशीर किमतीत उपलब्ध होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com