Pune : पोस्ट ऑफीस आणि कुरिअर कंपन्यांमध्ये दिवाळी फराळाच्या पार्सलसाठी गर्दी

दिवाळी फराळ पाठविण्यासाठी कुरिअर कंपन्या आणि पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी
Diwali
DiwaliSakal

पुणे : परदेशात स्थायिक झालेले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रीण तसेच व्यावसायातील आणि कंपनीतील सहकाऱ्यांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी कुरिअर कंपन्या आणि पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी होवू लागली आहे. ऐन दिवाळीत पार्सलचे दर वाढू नये, दिवाळीत होणारी गर्दी टाळता यावी आणि फराळ वेळेत परदेशात पोचावे म्हणून अनेकांनी ऑक्टोबरच्या सुरवातीपासूनच फराळ पाठविण्यास सुरवात केली आहे.

कोरोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे अनेकांनी गेली दोन वर्ष परदेशात असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तींना फराळ पाठवले नव्हते. मात्र यावर्षी कोणतीही बंधने नसल्याने आणि पार्सलचे सर्व पर्याय खुले असल्याने यंदा मोठ्या प्रमाणात फराळ परदेशात पाठवले जात आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच फराळ परदेशात पोचावे या हेतूने अनेकांनी गेल्या आठवड्यात फराळ परदेशात पाठवले. हळूहळू ही संख्या आता वाढत आहेत. पार्सल करण्यात येत असलेल्या फराळात विविध प्रकारचे लाडू, चिवडा, करंज्या, चकली, अनारसे अशा पदार्थांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यासह पुण्यातील खास खाद्यपदार्थ देखील पाठवले जात आहेत, अशी माहिती कुरिअर सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांनी दिली.

अमेरिका व युरोपमध्ये सर्वाधिक पार्सल :

पुण्यातून अमेरिका आणि युरोपमध्ये दिवाळी फराळ पाठविणाऱ्यांची संख्या जास्त आहे. फिलिपिन्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, चीन, आयर्लंड यासारख्या देशांतही पुण्यातून दिवाळी फराळाचे पार्सल पाठविण्यात येत आहेत. दिवाळीचे काही दिवस आधी मोठ्या प्रमाणात पार्सल येतात. तेव्हा होणारी गर्दी टाळण्‍यासाठी एक महिना आधीपासूनच नागरिक पार्सल पाठवत असल्याची माहिती कुरिअर व्यावसायिकांनी दिली.

अमेरिकेत असलेल्या बहिणीसाठी मी गेल्या १६ वर्षांपासून दिवाळी फराळ आणि सजावटीचे साहित्य पाठवत आहे. यंदा मी अनारसे, बुंदीचे लाडू, दगडी पोहे, करंज्या असे फराळ पाठवले आहे. गर्दी टाळण्यासाठी मी दरवर्षी दिवाळीच्या १५ ते १५ दिवस आधीच पार्सल पाठवतो. ते आठ ते १० दिवसांत अमेरिकेत पोचते. पार्सलचा खर्च गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यंदा मला पार्सलसाठी साडेसहा हजार रुपये मोजावे लागते.

चैतन्य भिडे, बहिणीला फराळ पाठविणारे व्यावसायिक

परदेशात दिवाळी फराळ पाठविणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. आमच्याकडे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये पार्सलसाठी सर्वाधिक बुकिंग आहे. वाहतूक खर्च वाढल्याने पार्सलच्या दरात वाढ झाली आहे.

आशिष पाळंदे, कुरिअर व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com