Drains Covers : पावसाळी गटारांसाठी बनविले सुरक्षित झाकण ; पुण्याच्या डॉ. सोरटे यांनी प्राप्त केले पेटंट

मुसळधार पावसात पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांचे झाकण उघडे ठेवण्यात येते. यामुळे मुंबईत मागील सहा वर्षांत ३५० लोकांचा मृत्यू झाला तर पुण्यात गंभीर अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
Drains Covers
Drains Covers sakal

पुणे : मुसळधार पावसात पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांचे झाकण उघडे ठेवण्यात येते. यामुळे मुंबईत मागील सहा वर्षांत ३५० लोकांचा मृत्यू झाला तर पुण्यात गंभीर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पावसाळी पाण्याच्या जलद निचऱ्यासाठी एका नव्या आणि सुरक्षित झाकणाचा शोध पुण्यातील प्राध्यापकाने आणि दोन संशोधक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. तसेच यासाठीचा स्वामित्व हक्कही (पेटंट) त्यांनी प्राप्त केले आहेत.

पर्वती येथील अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. रविराज सोरटे आणि संशोधक विद्यार्थी सोहम बोराटे व विनायक गुंड यांनी ‘इंडियन सॉल्ट शेकर मॅनहोल कव्हर’ नावाचे हे नवे झाकण विकसित केले आहे. एखाद्या हॉटेलात आपण मिठाच्या डबीचे झाकण जसे सरकवतो, तसे हे नवे झाकण काम करते. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यावर पावसाळी गटारांसह बंदिस्त नाल्याचेही झाकण उघडे ठेवण्यात येते. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच लोकांच्या जिवालाही धोका संभवतो. पण हे झाकण पावसाळ्यात एका चावीद्वारे फिरवता येईल आणि त्यातून पाण्याचा निचरा होईल. संपूर्ण झाकण काढून बाहेर ठेवण्याची गरज नाही, असे डॉ. सोरटे यांनी सांगितले.

Drains Covers
Pune News : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील

स्थापत्य अभियांत्रिकीतील आपले शिक्षण समाजाच्या उपयोगाला यावे, म्हणून असे प्रकल्प हाती घेतल्याचे डॉ. सोरटे यांनी सांगितले. ते म्हणतात, ‘‘दरवर्षी पावसाळ्यात गटारात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. यावर आपण काय उपाय शोधू शकतो, म्हणून हे अभिनव झाकण तयार केले आहे. जे पुराच्या वेळी बाहेर काढण्याची गरज भासणार नाही. आम्ही विविध महापालिका आणि नगरपालिकांशी संपर्क साधत असून, प्रत्यक्ष वापरात येणारे झाकण तयार केले आहे.’’ प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर त्यात आवश्यक सुधारणा करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

नव्या झाकणातील सुधारणा

  • जात्याप्रमाणे नव्या झाकणाचे दोन भाग

  • पाऊस नसल्यावर ते बंद अवस्थेत राहील. यामुळे डासांचा आणि छिद्रे निकामी होण्याची शक्यता कमी

  • पाणी वाढल्यावर वरचा एक भाग फिरवता येईल. खालच्या छिद्रांच्या रेषेत आल्यावर निचऱ्यासाठी जास्त जागा

सध्याच्या अडचणी

  • पावसाळ्यात गटारांच्या झाकणावरील छिद्रांमध्ये माती बसते, त्यामुळे ती निकामी होतात

  • मुसळधार पावसात पाण्याचा निचरा करण्यासाठी संपूर्ण झाकणच बाहेर काढावे लागते

  • वाहतुकीला अडथळा तसेच जीवितास धोका निर्माण होतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com