

Railways Announces Sunday Mega Block at Pune Station; Services May Be Affected
sakal
पुणे : पुणे-दौंड लोहमार्गावरील पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण कामासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकाच्या यार्डमध्ये रविवारी (ता. १४) विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या ९ तासांच्या ब्लॉकमुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि दाखल होणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध नसतील.