Pune News | शहरात आठवडाभर ढगाळ हवामान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain | शहरात आठवडाभर ढगाळ हवामान

Pune Rain | शहरात आठवडाभर ढगाळ हवामान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र येत्या ४८ तासात वायाव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यातून तयार होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचापर्यंत आहे. त्याच्या प्रभावामुळे येत्या तीन ते चार दिवसात पुण्यासह राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: हॉटेलमधील खाणे महागणार ! चालकांकडून खाद्यपदार्थाच्या दरात वाढ

शहर आणि परिसरात पुढील आठवडाभर तरी आकाश सामान्यतः ढगाळ आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मंगळवारी (ता.१७) रात्री शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मागील आठवड्यात पडलेली कडाक्याची थंडी गायब झाली असून, शहरातील सरासरी किमान तापमान २२.६० अंश सेल्सिअसवर पोचले आहे.

हेही वाचा: शुद्धीकरणासाठी गोमूत्र पिण्याची सक्ती ते पुरंदरेंच्या अस्थीविसर्जनावरून नवा वाद

बुधवारी सकाळी ८ः३० पर्यंतचे पर्जन्यमान (मिलीमीटर) :

  • शिवाजीनगर : ७.४

  • लोहगाव : ९.४

  • पाषाण : ९.२

  • चिंचवड : १५

  • लवळे : ४.५

  • मगरपट्टा : ५

loading image
go to top