Pune rainfall latest news
esakal
पुणे : गेल्या आठवडाभर पुणे शहर, घाटमाथा आणि कोकणात धुवाधार बरसलेल्या पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक भागांतील पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच ते सहा दिवस राज्याच्या या भागांत मुसळधार पावसाची शक्यता (IMD Pune weather forecast) नसल्याचे स्पष्ट केले आहे.