Pune Rain : पुण्यात मेघगर्जनेसह सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; वाचा, कोणत्या परिसरात रिमझिम?

Pune Rain Update thunderstorm and lightning in in city
Pune Rain Update thunderstorm and lightning in in city
Updated on

पुणे : पुण्यात ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने पुणे परिसरात सलग दुसऱ्या दिवशी (ता.22) पावसाने हजेरी लावली आहे. काल (ता.21) संध्याकाळी झालेल्या पावसाने पुण्याला झोडपून काढले होते. दरम्यान, ''पुढील तीन दिवस शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार  शहरात दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले आणि हलक्या पावसाच्या सरी सुरू झाल्या. अचानक आलेल्या पावसामुळे दुकानदार आणि ग्राहक यांची धावपळ झाली. दरम्यान, सकाळापासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. दरम्यान विजेता कडकडाटसह आज दुपारी औंध, बाणेर पाषाण, नगररोड, बुधवारपेठ, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कोंढवे धावडे परिसरस, भोसरी परिसरात पावासाने हजेरी लावली. 

हे वाचा - पुणेकरांनो, कोणतीही घ्या, पण लस घ्याच!

शहरातील कोणकोणत्या भागात पावसाने लावली हजेरी?
- औंध, सकाळ नगर, पाषाण, पंचवटी, महाळुंगे व सूस परिसरात पावसाला सुरुवात.
- उत्तमनगर, कोंढवे धावडे, ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात
- नगररोड भागात रिमझिम पावसाला सुरुवात ..
- शनिवारवाडा परिसरात विजेच्या कडकडटासह मुसळधार पाऊस 
- सिंहगड रस्ता भागात रिमझिम पावसात सुरुवात
-सातारा रस्ता,सहकारनगर, पद्मावती, पर्वती दर्शन, स्वारगेट, महर्षी नगर, मुकुंद नगर इ. परिसरात रिमझिम पाऊस सुरू
- भोसरी सकाळपासून कडाक्याचे ऊन तर दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले होते. उकाडा ही खूप जाणवत होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी सुरू झाल्या.
- रामटेकडी परिसरात ढगांचा कडकडाट व रिमझिम पावसाची सुरूवात
- केशवनगर मुंढवा भागात रिमझिम पावसास सुरवात
- जुनी सांगवी परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी
- बिबवेवाडी सह परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस
- बाणेर बालेवाडी परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
- वाघोलीतही विजेच्या गडगडासह पावसास सुरुवात
- कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात तुरळक पाऊस

का पडतोय पाऊस?
विदर्भ व परिसर आणि मध्य प्रदेशात दोन ते तीन दिवसांपासून चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच तमिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टी परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. याचा थेट परिणाम राज्याच्या वातावरणावर होत आहे. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

हे वाचा - भारताच्या लस डिप्लोमसीला झटका! लस पुरवठा करण्यास सीरमचा नकार

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला इशारा
राज्यात अनेक ठिकाणी गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील अनेक भागांत कमीअधिक प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपूरी येथे ३८.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर, जळगाव येथे १७.३ अंश सेल्सिअस इतक्या सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com