Pune Rain Updates : सहकारनगर, धनकवडीत पावसाचा हाहाकार; 227 मिलीमीटर पावसाची नोंद  

टीम ई-सकाळ
Thursday, 15 October 2020

सहकारनगर, धनकवडी या उंचावरील भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुण्यात इतर भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात सहकारनगर आणि धनकवडी परिसरात सर्वांत जास्त पाऊस झाला आहे. 

पुणे : पुण्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले. पुण्याच्या मध्य वस्तीसह उपनगरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. सहकारनगर, धनकवडी या उंचावरील भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुण्यात इतर भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात सहकारनगर आणि धनकवडी परिसरात सर्वांत जास्त पाऊस झाला आहे. 

शिवाजीनगर येथील वेधशाळेत बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी ७६ मिलीमीटर पाऊस बुधवारी रात्री साडेआठ ते साडेअकरा या वेळेत झाला. पुण्यात रात्री बारानंतर पावसाचा जोर कमी झाला. पण, तोपर्यंत पावसाने शहर आणि परिसराला धुवून काढले होते. 

आणखी वाचा - दगडूशेठ हलवाई मंदिरसमोर वाहत होते पाणी, पाहा व्हिडिओ

आणखी वाचा - पावसाने उडवली पुणेकरांची झोप

ठिकाण पाऊस (मिलीमीटर)
औंध 73.50
कर्वेनगर/वारजे 70.00
कोथरूड 79.50
घोले रोड 163.00
ढोले-पाटील रोड 86.50
येरवडा/संगमवाडी 78.50
नगर रोड/वडगाव शेरी 108.00
भवानी पेठ 103.00
कसबा पेठ 75.00
टिळक रोड 40.00
सहकारनगर/धनकवडी  227.50
महापालिका परिसर 105.50
हडपसर 10.50
कात्रज 91.50
कोंढवा/येवलेवाडी 68.50

घरीच राहा, सुरक्षित राहा
पार्श्वभूमीवर हवामान खात्याने गुरूवारी परत पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण रहाणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला. विजांचा गडगडाटासह हा पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहनही केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune rain updates dhankawadi sahakarnagar records maximum rain