Pune: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील चार दिवस यलो अलर्ट

Heavy Rain Brings Relief to Pune Residents: पुण्यात जोरदार पावसाने दमदार हजेरी लावत उकाड्यापासून दिलासा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: एक जूनपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने अखेर रविवारी पुण्यात जोरदार हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता, परिणामी उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र त्यासोबतच वाहतूक कोंडी, अपघात आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com