Pune News : केळकर संग्रहालयाचे 'मेटाव्हर्स' तयार होणारे देशातील पहिलेच संग्रहालय

वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पुण्याच्या राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
raja dinkar kelkar museum
raja dinkar kelkar museumsakal
Summary

वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पुण्याच्या राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पुणे - वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पुण्याच्या राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या संग्रहालयाचे मेटाव्हर्स लवकरच साकारणार असून त्यासाठी भारतातील पहिले मेटाव्हर्स व्यासपीठ असलेल्या ‘भारतव्हर्स’ व संग्रहालय प्रशासनात नुकताच सामंजस्य करार झाला. मेटाव्हर्सच्या दुनियेत पाऊल टाकणारे हे देशातील पहिलेच संग्रहालय ठरले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचे वैभव जगासमोर आणणे, हा ‘भारतव्हर्स’चा उद्देश आहे. जगभरातील लोकांना भारतातील विशेष स्थळांचा घरबसल्या आभासी स्वरुपात अनुभव देत, त्यांना या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘भारतव्हर्स’तर्फे या स्थळांच्या मेटाव्हर्सची निर्मिती करण्यात येते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून केळकर वस्तुसंग्रहालयाचे मेटाव्हर्स तयार होणार आहे. त्यासाठी झालेल्या सामंजस्य करारानुसार संग्रहालयाद्वारे डिजिटल कंटेन्ट पुरवण्यात येणार असून ‘भारतव्हर्स’तर्फे मेटाव्हर्ससाठी आवश्यक आराखडा, विकास आणि सुविधा तयार करण्यात येणार आहेत.

‘भारतव्हर्स’च्या व्यासपीठावर हा अनुभव घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. मोबाईल फोन, वेब ब्राउजर, हेड माउंटेड डिव्हाईस आदी उपकरणांच्या माध्यमातून हा अनुभव घेणे शक्य होणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. श्रीकांत केळकर यांच्या सहाय्याने निर्माण केलेली राजा दिनकर केळकर संग्रहालयाची त्रिमितीय आभासी सफर (थ्रीडी व्हर्च्युअल टूर) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मेटाव्हर्स म्हणजे काय?

मेटाव्हर्स म्हणजे त्रिमितीय (थ्रीडी) तंत्रज्ञानाद्वारे अनुभवता येणारे आभासी विश्व. आपण आहोत त्या ठिकाणाहून जगातील इतर कोणत्याही स्थळी आपण प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा अनुभव, त्या स्थळाची संपूर्ण माहिती, तेथील इतिहास आदी बाबी याद्वारे अनुभवता येतात. मात्र हे तंत्रज्ञान अद्यापही विकसनशील स्थितीत असून जगभरातील तज्ज्ञ त्यावर संशोधन करत आहेत.

भारतातील प्रत्येक चौरसफुटावरील माहिती व अनुभवाचे संकलन करून ‘आभासी भारत’ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ‘भारतव्हर्स’ने ठेवले आहे. जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राजा दिनकर केळकर संग्रहालयाने निश्चितच मेटाव्हर्स व्यासपीठाचा उपयोग केला पाहिजे.

- रोहित श्रीवास्तव, ‘भारतव्हर्स’चे संस्थापक-संचालक

आमच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक व महत्त्वाचा निर्णय आहे. आभासी माध्यमातून संग्रहालय पाहण्यासाठी जगभरातील लोकांना मेटाव्हर्सचा उपयोग होऊ शकतो. आभासी स्वरुपात असले तरी वापरकर्त्याला आपण प्रत्यक्षात त्या वेळेला संग्रहालयातच असल्याचे याद्वारे अनुभवता येणार आहे. संग्रहालयाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी त्याची मदत होईल.

- सुधन्वा रानडे, संचालक - राजा दिनकर केळकर संग्रहालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com