पुण्यातील घरांची विक्री ९० टक्के कोरोनापूर्व स्थितीवर; 'जेएलएल'चा सर्वे

Pune real estate
Pune real estate

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून देशातील बांधकाम क्षेत्र देखील चांगल्या प्रकारे सावरत आहे. गेल्या वर्षांच्या तिमाहीचा विचार करता यंदा देशातील सात प्रमुख शहरांमधील फ्लॅटची विक्री ९० टक्के कोरोनापुर्व स्थितीवर आली आहे. जानेवारी ते मार्च २०२० दरम्यान या शहरांत २७ हजार ४५१ घरांची विक्री झाली होती. तर याच काळात यावर्षी २५ हजार ५८३ हजार फ्लॅट विकले गेले आहेत. ‘जॉन्स लॅग लसान’ने (जेएलएल) केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आले आहे. पुणे, मुंबई, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकत्ता या शहरांत हा सर्वे करण्यात आला आहे. पुण्यात विमाननगर, खराडी, वाघोली, हिंजवडी, वाकड आणि बाणेर परिसरातील सर्वांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

घरांची झालेली विक्री 
शहर - पहिली तिमाही २०२०- पहिली तिमाही २०२१- पुर्वस्थितीबाबतची टक्केवारी
पुणे -          ३,७२८                  ३,७४५                      १०० टक्के
मुंबई -        ६,८५७                 ५,७७९                      ८४ टक्के
बंगळूर -      ४,१८६                  २,३८२                       ५७ टक्के
चेन्नई-         २,४५३                  ३,२००                         १३० टक्के
दिल्ली -       ५,९४१                  ५,४४८                       ९२ टक्के
हैदराबाद -   ३,०२७                  ३,७०९                      १२३ टक्के
कोलकत्ता -   १,२५९                 १,३२०                       १०५ टक्के

विक्रीत सातत्याने होणारी वाढ ही फ्लॅटची मागणी असल्याचे स्पष्ट करते. ग्राहक पुन्हा येत असल्याने मार्केटचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. गृहकर्जाला कमी व्याजदर, घरांच्या कमी किमती, आकर्षक इएमआय योजना, विकसक देत असलेल्या आॅफर आणि महाराष्ट्रासारख्या सरकारकडून मुद्रांक शुल्कात देण्यात आलेली सवलत यामुळे घर खरेदी वाढली आहे. लसीकरण जोरात सुरू झाल्यानंतर खरेदीदार पुन्हा मार्केटमध्ये येतील. - डॉ. सामंतक दास, प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधक, आरर्इआयएस, जेएलएल

परवडणा-या घरांना पसंती कायम :
पुण्यासह देशात इतर शहरांत देखील परवडणा-या घरांना असलेले मागणी आजही कायम आहे. येत्या काळात अशाच घरांचे बांधकाम करण्याचा ट्रेन्ड कायम राहील, असा अंदाज जेएलएलने व्यक्त केला आहे. कोरोनाचा परिमाण म्हणून न विकलेल्या घरांची टक्केवारी दोनने वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com