लॉकडाउनमध्ये पुणेकर आरोग्याबाबत जागरुक झाले की नाही? काय म्हणते आकडेवारी?

Pune residents positive confidence in health increased Between lockdown 1 and 3
Pune residents positive confidence in health increased Between lockdown 1 and 3
Updated on

पुणे : लॉकडाउनमुळे आलेली जागतिक मंदी, आर्थिक प्रगतीची अनिश्चितता आणि सर्वत्र वाढत असलेला कोरोना संसर्ग यामुळे नागरिकांमध्ये अशांतता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या कठीण काळातही लॉकडाऊनच्या पहिल्या ते तिसऱ्या टप्प्यापर्यंत पुण्यातील नागरिकांचा आरोग्य संबंधित सकारात्मक विश्वास वाढल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. टीआरए रिसर्च या 'कन्झ्युमर इन्साइट व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनी'ने केलेल्या सर्वेक्षणातुन ही माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 क्लिक करा

टीआरएमार्फत यापूर्वी 'मेंटल वेलबीइंग' आणि 'टीआरएज कोरोनाव्हायरस कॉर्पोरेट इनसाइट्स 2020' असे अहवाल प्रकाशित करण्यात आले होते. "लॉकडाउन दरम्यान आरोग्य आणि आर्थिक चिंता निर्देशांक 2020" या नुकत्याच प्रकाशित झालेल्या तिसऱ्या अहवालाबाबत माहिती देताना टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली म्हणाले, "या सर्वेक्षणामध्ये लॉकडाउनच्या काळात आरोग्य आणि आर्थिक संकटातून मुक्त होण्याबाबतची चिंता यावर नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. यासाठी विविध शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यातून असे स्पष्ट झाले की, पुणे शहरातील नागरिकांचा आरोग्य संबंधातील विश्वास कमी झाला नसून तो वाढला आहे. या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांचा विश्वास हा 75 टक्के तर तिसऱ्या टप्प्यामध्ये हा विश्वास 83 टक्के वाढल्याचे स्पष्ट झाले. परंतु आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठीची चिंता मात्र पुणेकरांना आहे असे यातून दिसून आले. त्यामध्ये आर्थिक संकटातून मुक्त होण्याचा विश्वास लॉकडाऊन एक ते तीन दरम्यान 73 टक्क्यावरून 64 टक्क्यांवर आला. तसेच इंदोर, कोयम्बतूर आणि जयपूर शहरातील नागरिकांनी देखील आरोग्य संबंधीत विश्वासात सकारात्मक वाढ दर्शवली."

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितली आरोग्यासाठी पंचसूत्री; वाचा सविस्तर

अहवालानुसार लॉकडाउन 1.0 ते 3.0 मधील लॉकडाऊन अंमलबजावणीच्या प्रभावीतेच्या फरक लक्षात घेता, सोळा शहरांपैकी नऊ शहरांमध्ये परिणामकारकता निर्देशांकामध्ये लक्षणीय घट झाली. तर लॉकडाऊन अंमलबजावणीच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ दर्शविणारी शहरे म्हणजे चेन्नई (28% पर्यंत), कोचीन (22% पर्यंत) आणि नागपूर (17% पर्यंत) आहेत. 

लॉटरी बहाद्दारांची लॉकडाऊनमध्ये 'अशी' लागली 'लॉटरी'

"काळानुसार अस्वस्थता वाढत जाते आणि या लॉकडाऊनसारख्या अत्यंत कठीण काळात काही शहरांना आपल्या आरोग्य आणि आर्थिक संकटांना दूर करण्यासाठी चांगले निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाउन 1.0 ते 3.0 पर्यंत कोलकत्ता आणि हैदराबाद या शहरांमध्ये मात्र आरोग्य आणि आर्थिक चिंता याबाबत कोणतेही बदल झाल्याचे दिसून आले नाही."
- एन. चंद्रमौली, टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी

टीआरएच्या "लॉकडाउन दरम्यान आरोग्य आणि आर्थिक चिंता निर्देशांक 2020" सर्वेक्षणाबाबत
- हा अहवाल 30 एप्रिल ते 21 मे कालावधीत तयार करण्यात आला
- यामध्ये 16 शहरांतील नागरिकांची मते घेण्यात आली
- अहवालाच्या निष्कर्ष प्रमाणे पुण्यासह कोयम्बतुर, जयपूर आणि इंदोर या शहरांमधील नागरिकांचा आरोग्य संबंधित विश्वास वाढला
- आर्थिक संकटातून मुक्त होण्याबाबत दिल्ली, कोची आणि गुवाहाटी शहरांनी सकारात्मक विश्वास दर्शविला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com