Pune : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अफवांच्या वावड्याने सर्वसामान्य हैराण

समाजसेवक,राजकीय नेत्यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विभागाकडे धाव
Pune : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अफवांच्या वावड्याने सर्वसामान्य हैराण
Pune : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अफवांच्या वावड्याने सर्वसामान्य हैराणpune

जुनी सांगवी (पुणे) : गेली तीन दिवसांपासून दापोडी भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प होवू घातला असल्याच्या अफवांच्या वावड्या उठत असल्याने येथील रहिवाशी सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे.कुठल्याही प्रशासनाच्या सुचना माहीती नसताना देखील या अफवांचे पिक आल्याने येथील स्थानिकांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.अपुरी माहीती व घरांवर टांगती तलवार येणार का?घरे पाडून पुनर्वसन होणार का?ते कसे? या भितीने गेली दोन दिवस काय व कसे होणार यांच्या चर्चांना उधाण आले आहे.दोन महिन्यांवर आलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थानिक राजकीय मंडळी सक्रिय झाली आहे. तर पुनर्वसन एसआरए प्रकल्पाला दापोडी येथील एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीने दिवाळी सणात पणत्या लावून विरोध केला.पुनर्वसनाच्या संभ्रमाने दापोडीत राजकीय धुळवड पाहायला मिळत आहे.

नविन नियमावली बाबत हरकत व एसआरए प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे पत्र निवेदन देण्यात आली आहेत.एसआरए, पीएमओ,एसआरएस,घरकुल योजना,म्हाडा योजना,रमाई योजना,वाल्मिकी आवास योजना,इ.घरा संदर्भातील योजना याबाबत नागरिकांमध्ये सविस्तर माहिती अभावी गैरसमज व भितीचे वातावरण निर्माण होत आहे. स्थानिक नगरसेविका स्वाती काटे,राजु बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते संदिप गायकवाड, गोपाळ मोरे,रवि कांबळे संघर्ष कृती समीतीच्या वतीने झोनीपू कार्यकारी अधिकारी यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले आहे.तर दापोडी येथील नागरिकांची घरे पाडून कोणतेही पुनर्वसन होणार नाही असे पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त यांचे लेखी आदेश आहेत का?असा सवाल दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समिती कडून विचारला जात आहे.

Pune : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अफवांच्या वावड्याने सर्वसामान्य हैराण
"आग लागली तेव्हा ICUमध्ये कर्मचारी नव्हते", सीसीटीव्ही फूटेज सापडलं

कोट-तुर्तास आमच्या कार्यालयाकडे पुनर्वसनाबाबत कोणताही प्रकल्प आलेला नाही.नागरिकांनी अफवांना बळी पडू नये.महापालिकेकडून असा नियोजित प्रस्ताव आलेला नाही.या बाबत आपण स्वत: नागरिकांमध्ये जावून संवाद साधून संभ्रम दुर करू. -राजेंद्र निंबाळकर मुख्यकार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन पिंपरी-चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com