Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ससून रुग्णालयात फोन; सर्वांची उडाली दणादाण

ससून जनरल हॉस्पिटलमधील अधिष्ठातांना एक कॉल अन् सर्वांची धावपळ उडली
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal

मुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आल्यावर यंत्रणेची अनेकदा धावपळ उडते. असाच काहीसा प्रकार सोमवारी संध्याकाळी पुण्यातील ससून या शासकीय रुग्णालयात घडल्याचं दिसुन आलं. संध्याकाळी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना फोन आला. फोन करणारा तब्बल पाच मिनिटं बोलत होता. त्याने अधिष्ठातांकडून सर्व माहिती घेतली. मग काही सूचनाही केल्या. परंतु अधिष्ठातांना संशय आला. मग त्यांनी खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावला अन् सर्व प्रकार उघड झाला.

बनावट फोन करून फसवणूक करण्याचे प्रकार पुण्यात वाढताना दिसुन येत आहेत. ससून जनरल हॉस्पिटलमध्ये सोमवारी अशीच एक घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयात लँडलाइनवर फोन आला. फोन करणाऱ्याने आपण मुख्यमंत्र्यांचे पीए असल्याचे सांगितले. त्याने पाच ते सहा मिनिटे सर्व माहिती घेतली. सर्वांची पळापळ सुरु झाली. त्या व्यक्तीने मग ससूनच्या आवारातील दोन कँटीन तातडीने बंद करण्याची आदेशवजा सूचना दिली.

Eknath Shinde
Sushma Andhare: अंधारे VS शिरसाट यांच्यातील वाद सुरूच, शिरसाटांनी शेअर केला अंधारेंचा 'तो' Video

फोनवरून "मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतो आहे. ससूनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरक्यू मेस बंद करा आणि तातडीने दुसरे टेंडर प्रक्रिया भरा" असा आदेश ससून हॉस्पिटलचे डीन डॉ संजीव ठाकूर यांना आला.

अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना या संपुर्ण प्रकरणाचा संशय आला. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालतात संपर्क केला. त्यानंतर हा कॉल फेक असल्याचं निष्पन्न झालं. तत्पूर्वी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी संध्याकाळी कँटीन समितीची बैठक घेतली होती. चार कँटीनच्या निविदेची मुदत संपल्यामुळे ती बंद करणार असल्याबाबत त्यामध्ये चर्चा झाली होती.

ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी हा प्रकार फेक कॉल आल्याचे सांगत याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे सांगितले. अशा प्रकरणात वेळ वाया न घालवता त्यापेक्षा रुग्णांच्या शस्त्रक्रिया जास्त महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.

Eknath Shinde
Maharashtra Politics: गुलाबराव पाटीलांची मविआवर खालच्या शब्दात टीका म्हणाले, 'तीन जणांची माय...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com