

‘Eye-less’ Snake from Pune Gains Global Attention, Study Published
sakal
पुणे : पाषाण-सुतारवाडी परिसरात आढळलेल्या जन्मताच डोळे नसलेल्या एका दुर्मीळ ‘तस्कर’ या सापाच्या शोधाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. पुण्याचे सर्पमित्र अनिल कानस्कर आणि सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांचे हे संयुक्त संशोधन अमेरिकेतील ‘रेपटाईल्स अँड अँफीबियन्स’ या जर्नलमध्ये नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.