Leopard Cubs Found in Ambale Shirur
esakal
न्हावरे : आंबळे (ता. शिरूर) येथील शेतात दोन दिवसांपूर्वीच ऊस तोड सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून (Leopard Cubs Found in Ambale Shirur) आले होते. वनविभागाने त्या बछड्यांची आईशी भेट घडवून आणली होती. मात्र, आता पुन्हा याच ठिकाणी गुरुवारी (ता.५) बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने येथील परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरातील शेतकरी व ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.