पुणे : शिवछत्रपतींचे शिवकालीन चित्र प्रकाशात

चित्र सतराव्या शतकातील गोवळकोंडा चित्रशैलीमध्ये चित्रित केलेले आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी पत्रकार परिषदेत दिली
पुणे : शिवछत्रपतींचे शिवकालीन चित्र प्रकाशात
पुणे : शिवछत्रपतींचे शिवकालीन चित्र प्रकाशातsakal

पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणखीन १ अप्रकाशित शिवकालीन चित्र युरोपमध्ये असून ते प्रथमच प्रकाशात येत आहे. चित्र सतराव्या शतकातील गोवळकोंडा चित्रशैलीमध्ये चित्रित केलेले आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तारे यांनी शोधलेल्या या चित्राचे अनावरण शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आले असून चित्राच्या प्रकाशनासाठी संग्रहालयाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे.

यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे आणि इतिहास अभ्यासक राजेंद्र टिपरे हे यावेळी उपस्थित होते. या पूर्वी तारे यांनी जूनमध्ये शिवाजी महाराजांची तीन चित्रे संशोधित व प्रकाशित केली होती. त्यानंतरचे हे चित्र चौथे असून याबाबत तारे म्हणाले, ‘‘महाराजांच्या चित्राबरोबरच भारतामधील सतराव्या शतकातील कुत्बशाह, मादण्णा, औरंगजेब अशा अन्य राजकीय व्यक्तींची चित्रे सुद्धा या संग्रहालयात आहेत. अठराव्या शतकापासून ही सर्व चित्रे फ्रान्समधील लुईस चार्ल्स या सरदार घराण्याच्या ऐतिहासिक वास्तू संग्रहात होती. तेथून हे चित्र फ्रान्समधील सॅव्ही नावाच्या संग्राहकाच्या ऐतिहासिक वास्तू संग्रहालयामध्ये हस्तांतरित झाली. सध्या सर्व चित्रे अल्बम स्वरूपात सॅव्ही कलेक्शनमध्येच आहेत.’’

पुणे : शिवछत्रपतींचे शिवकालीन चित्र प्रकाशात
राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; 'लालपरी'चा मार्ग होणार का खुला?

बलकवडे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याकडे असलेली माहिती अपूर्ण आहे. मुघल आक्रमणात महाराजांच्या कार्यालयीन दफ्तरखान्यातील कागदपत्रे नष्ट झाली. अन्यथा महाराजांविषयी अधिक तपशीलवार माहिती उपलब्ध झाली असती. मात्र महाराजांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आजघडीला इतिहास अभ्यासकांची आपल्याला गरज आहे.’’

चित्राचे वैशिष्ट्ये ः

चित्रामध्ये महाराजांची करारी व प्रसन्न मुद्रा, डोक्यावर शिरोभूषण व तुरा, खांद्यावर शेला दिसत असून त्यांच्या डाव्या बाजूला कट्यार खोवलेली आहे. चित्रामध्ये महाराज एका मोकळ्या जागेत उभे आहेत असे दाखविण्यात आले आहे. हे चित्र १७ व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. असे तारे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com