लॉकडाउनमध्ये लालपरी ठरली आधार; 'एवढ्या' लोकांना सुखरुप पोहचवले घरी

In Pune ST bus helps to 50000 passengers to return home in last 20 days
In Pune ST bus helps to 50000 passengers to return home in last 20 days

पुणे : शहर आणि ग्रामीण भागातील दुवा साधऱया एसटी महामंडळाच्या लालपरीने लॉकडाउनच्या काळातही गेल्या 20 दिवसांत मजूर, कामगार, विद्यार्थी आदी 50 हजार प्रवाशांना त्यांच्या घरी सुखरूप पोचविले. प्रवासी वाहतूक करतानाच आता एसटी महामंडळाने मालवाहतुकीचाही व्यवसाय सुरू केला असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहराभोवतालचे 13 तालुके नव्हे तर, अवघ्या राज्याच्या कोणत्याही भागात पुण्यातून एसटीची बस जाते, हे पुणे विभागाचे वैशिष्ट्य. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर या आगारांतून एसटीची वाहतूक होत असते. कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाल्यामुळे 25 मार्चपासून एसटीची संपूर्ण वाहतूक बंद होती. 5 मे पासून लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यास केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानुसार पुणे आणि परिसरात अडकलेल्या 40 मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावी पोचविण्यास एसटी प्रशासनाने 10 मे पासून सुरवात केली. त्यासाठी जिल्हा प्रशासन, काही स्वयंसेवी संघटना यांनी पुढाकार घेतला. त्यांना एसटीच्या अधिकाऱयांनी साथ दिली. प्रशासनाने हाक मारल्यावर कंड्कटर, ड्रायव्हर, तंत्रज्ञ आणि लिपिक वर्गानेही प्रतिसाद दिला अन नियोजनानुसार सर्व काही जुळून आले. 

Video : पुण्यातील धरणांबाबत महत्त्वाची बातमी

- छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमांजवळ या मजूर, कामगारांना सोडण्यासाठी पुणे विभागातून 10 मे पासून 40 हजार मजुरांची रवानगी करण्यात आली. त्यासाठी तब्बल 1600 बस सोडण्यात आल्या. बांधकाम, हॉटेल, कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. 

Video : पुण्यातील धरणांबाबत महत्त्वाची बातमी

- पुण्यात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांनाही गावी परतायचे होते. राज्य सरकारच्या आदेशानुसार नगर, पालघर, सातारा, जळगाव आदी जिल्ह्यांसाठी 30 बस सोडण्यात आल्या. त्यातून सुमारे 750 विद्यार्थी आपआपल्या गावी रवाना झाले. अजूनही पुण्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना गावी जायचे आहे. परंतु, पुण्याचा समावेश रेड झोनमध्ये असल्यामुळे मर्यादा आल्या आहेत. 

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

- चाकण, जुन्नर परिसरात नंदुरबार, धुळे आणि यवतमाळ येथील आदिवासी समूहातील काही कुटुंबे काम करीत होती. त्यांना परतायचे होते. त्यासाठीचा खर्च काही संस्था आणि प्रशासनाने केला. त्यामुळे 30 बसमधून सुमारे 800 जण परतले. 

पुण्यात हे काय चाललंय, रोज `एवढे` जण करताहेत आत्महत्या; ही आहेत कारणे...​​

- ज्या ठिकाणी ग्रीन, ऑरेंज झोन आहे तेथील एसटी वाहतूक सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार इंदापूर, बारामती, वालचंदनगर येथे एसटी सेवा सुरू झाली आहे. तसेच सासवड, शिरूर, नारायणगाव, राजगुरूनगर आदी परिसरांतही एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली होती. परंतु, प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी ती बंद करण्यात आली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

एसटीतून आता मालवाहतूकही 
एसटी बसचा वापर प्रामुख्याने प्रवासी वाहतुकीसाठी होतो. परंतु, लॉकडाउनमुळे सध्या वाहतूक बंद आहे. त्यामुळे या बसचा वापर मालवाहतुकीसाठी करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्यानुसार 8 टनांपर्यंतचा माल एसटीतून सोडण्यास सुरवात झाली आहे. भाजीपाला, धान्य किंवा अन्य प्रकारचा पॅक बंद मालाची वाहतूक करण्यास दोन दिवसांपासूनच सुरवात झाली आहे. 

शासनाच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना फटका; गरवारे महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी अकरावीत नापास

''लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात पुण्याहून - नगरला धावलेल्या पहिल्या बसमध्ये मी प्रवास केला. त्यात कंडक्टर आणि ड्रायव्हरने खूप काळजी घेतली. या पुढील काळातही प्रवाशांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बसनेच प्रवास करावा, असे माझे आवाहन आहे.''
-किरण वाघ (विद्यार्थी) 

'' लॉकडाउनच्या काळात एसटीच्या बसमुळेच नगरमध्ये घरी पोचू शकलो. बसने येत आहे म्हटल्यावर घरच्यांनाही सुरक्षित वाटले. बसही स्वच्छ होत्या. त्यांचे निर्जतुकीकरण केलेले होते. त्यामुळे प्रवास सुरक्षित झाला.''
- सोन्या शिंदे (विद्यार्थी)

''लॉकडाउनच्या काळात बस सुरू करणे, हे आव्हान होते. त्यात कंडक्टर, ड्रायव्हरने मोलाची साथ दिली. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आम्ही प्रवासाचे नियोजन केले होते. एसटी ही खरोखरच प्रवाशांची जीवनदायीनी आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.''
- यामिनी जोशी (विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ) 

पुण्यातील एसटी दृष्टिक्षेपात (एरवीच्या काळात)
- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये - 4 आगारे, जिल्ह्यात 13 आगारे 
- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पुण्यातून एसटीची सुविधा 
- रोजची 700 बसची वाहतूक 
- 35 हजार प्रवाशांची ये-जा 
- 4 हजार 500 कर्मचारी 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com