
Son-in-Law Carries Elderly Woman 5 Km to Pune Hospital
Esakal
पुण्यात वृद्धेला तरुणानं पाठीवरून रुग्णालयात नेल्याची घटना समोर आलीय. तब्बल ५ किमी पायपीट केल्यानंतर वृद्ध महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात ही घटना घडली. रस्त्या अभावी आजारी महिलेला जावयानं खांद्यावरून नेलं. डोंगराळ भागात रस्ता नसल्यानं स्थानिकांची गैरसोय होते. या भागात रस्ता करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.