esakal | पुणे : महिलेची सोशल मीडियावर बदनामी करणा-या दोघांना पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

two arrested

पुणे : महिलेची सोशल मीडियावर बदनामी करणा-या दोघांना पोलिस कोठडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर : महिलेचा फोटो व नावाचा गैरवापर करुन त्याद्वारे बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन महिलेची बदनामी होईल, अशा घाणेरडया पोस्ट, अश्लिल कमेंटस केल्याने फेसबुक युआरएल धारक व मोबाईल क्रमांक धारक यांच्याविरुध्द तक्रार दिलेने एका परप्रांतीयासह दोघांना अटक करण्यात आली आहे. तर सदर महिलेने कमेंट केल्याने तिलाही अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी कैलास खंडू काकणे (वय ३५, मूळ रा. अंम्बुलगा ता. निलंगा, जि.लातूर, सध्या रा. घर नं. १, सुतार बिल्डींग, शिवाजीनगर, मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), बाळकृष्ण थंगमलाई (वय २७, मूळ रा.२६ आण्णा साउथ स्ट्रीट, शिवगिरी तेकनवली, चेन्नई, तामीळनाडू राज्य, सध्या रा. कटलास ब्रीज, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांसमवेत फिर्यादी महिला वंदना संतोष भोसले (वय ३८, रा. अजित रो हाउसच्या पाठीमागील बिल्डिंग, काकडे कॉलनी, उरुळी देवाची, मंतरवाडी, पुणे) यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलमान्वये कारवाई करुन अटक करण्यात आली आहे. तर दोघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान घडला आहे. भोसले या मराठा क्रांती मोर्चा या मराठा समाजाच्या संघटनेमध्ये मराठा सेवक म्हणून कार्य करतात. खोट्या ॲट्रॅसिटी माध्यमातून मराठा समाजावर होणा-या अन्यायावर आवाज उठवित संविधानिक मार्गाने कार्य करतात. हे कार्य थांबावे म्हणून गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अज्ञात इसमांनी त्यांचे नाव व फोटोचा वापर करुन फेसबुक या सोशल मीडिया साईटवर बनावट अकाउंट तयार केले आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या तिस-या लाटेची तयारी; पण कंत्राटी मनुष्यबळावर मर्यादा

७ ऑगस्ट रोजी त्यांचे फेसबुक अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्या होत्या. त्यांना फेसबुकच्या माध्यमातून ओळखत असलेल्या लोकांनी फेसबुक मेसेंजरद्वारे मेसेज करुन “ताई तुमच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवरुन फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे, तसेच तुमचे फोटो मॉर्फ करुन त्याखाली अश्लिल कमेंटस केलेल्या आहेत" असे सांगितले. त्यानंतर खात्री करण्यासाठी फेसबुक पडताळून पाहिले असता, त्यांना त्यांच्या फोटो व नावाचा वापर करुन तयार केलेले बनावट फेसबुक अकाउंट आढळून आले. त्यावर त्यांचा व विद्यमान आमदारांचा सत्कार करतेवेळीचा फोटो अश्लिलरित्या एडिट करुन तो पोस्ट करुन त्यावर अश्लिल कमेंट केली होती.

तसेच काही फेसबुक अकाउंट धारकांनी त्यांचे फेक अकाउंटवरुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केलेली पोस्ट पाहून सदरची पोस्ट जणू त्यांनी केली आहे, असे समजून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विरोधी समजून ख-या फेसबुक अकाउंटची शहानिशा न करता अतिशय घाणेरडया पोस्ट, अश्लिल कमेंटस, शिवीगाळ, धमकी, मॉर्फ फोटो असे त्यांचे फेसबुक अकाउंटवर पोस्ट करुन तसेच त्यांचा मोबाईल नंबर प्रसारित केला. त्यामुळे त्यांना वेगवेगळया अनोळखी मोबाईल नंबरवरुन फोन, व्हाटॲप व्हाईस, व्हिडिओ कॉल, अश्लिल मेसेजेस आले.

हेही वाचा: ‘आयटीआय’ची अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबरला होणार जाहीर

यातील अटक केलेल्यापैकी एकाने वेळोवेळी रात्री - अपरात्री व्हाटसॲप मेसेजेस करुन त्याद्वारे पत्ता मागितला असता तो त्यांनी देण्यास नकार दिल्याने फेक अकाउंट उघडून त्याद्वारे बदनामी करण्याची धमकी दिली. तर दुस-यानेही अशी धमकी दिली. म्हणून त्यांनी तक्रार दाखल केली. याबाबतच्या तांत्रिक बाबीची पडताळणी केलेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार राजेंद्र पुणेकर, संभाजी देवीकर, श्रीनाथ जाधव, ढमढेरे यांनी तिघांना अटक केली आहे.

loading image
go to top