पुणे : गरिबांच्या दोन हजार घरकुलांना अखेर मिळाली जागा

दोन हजार ५ बेघरांना पुणे जिल्हा परिषदेने घरकुलासाठी त्यांना मोफत जागा मिळवून दिली आहे.
प्रधानमंत्री आवास घरकुल
प्रधानमंत्री आवास घरकुलsakal

पुणे : हातावर पोट, रहायला हक्काचे घर नाही, सरकारी घर (घरकुल) मंजूर झाले पण ते बांधण्यासाठी जागाही नाही. पुणे जिल्ह्यात जागेला सोन्याचा भाव आलेला. त्यामुळे जागा खरेदी करण्याची ऐपत नाही. अशा परिस्थितीत सरकारी घरासाठी जागा कशी मिळवायची, या विवंचनेत असलेल्या दोन हजार ५ बेघरांना पुणे जिल्हा परिषदेने घरकुलासाठी त्यांना मोफत जागा मिळवून दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने आता उशिरा का होईना, या बेघरांना आता त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे भल्या-भल्यांनासुद्धा घरासाठी अर्धा-एक गुंठा खरेदी करणे अशक्य होऊन बसले आहे. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने, हातावर पोट असलेल्या गरिबांनी सरकारी घरकुलासाठी जागा खरेदी करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर मार्ग काढण्यासाठी घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली जागा खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेने दहा वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार, गिरीश बापट आणि केंद्र सरकारकडे सातत्याने केली होती.

प्रधानमंत्री आवास घरकुल
अंधारातील दुर्गम वाड्या-वस्त्या होणार प्रकाशमय; वीजेसाठी १२ कोटी मंजूर

या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर जागा खरेदीसाठी प्रति लाभार्थी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली. या पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अनुदान असे नाव देण्यात आले आहे. मात्र या अनुदानातूनही जागा खरेदी करणे अशक्य बनले होते.

त्यानंतर पुन्हा घरकुलांसाठी गायरान जमिन उपलब्ध करून देण्याची मागणी करणारा जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे पाठविला होता. हा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेने स्वतः हून पुढाकार जागा नसलेल्या घरकुलांसाठी जागा शोध मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत सरकारी जागा, अनुदानातून जागा खरेदी या फर्यायांसोबतच अन्य पर्यायाचाही अवलंब केला गेला आहे.

जागा नसलेली तालुकानिहाय घरकुले

हवेली ---२२६

पुरंदर --- ६५

वेल्हे ----४९

बारामती --- ५८७

इंदापूर ---- १५४७

दौंड ---- ७४

जुन्नर ---- १८९

आंबेगाव ----१२९

खेड ---- १८२

मावळ ----६६

शिरूर --- २९०

मुळशी ---- ९५

भोर ---- ००

एकूण ---- ३४९९.

प्रधानमंत्री आवास घरकुल
जिंतूर : दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात; दोन जण गंभीर

पर्यायनिहाय जागा मिळालेली घरकुले

  • पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना ---- ६६

  • बक्षिसपत्राद्वारे खासगी जागा ---- ३२०

  • अतिक्रमण नियमानुकूलनुसार ----५९४

  • गायरान‌ जमीन ---- १०२५

  • एकूण ---- २००५.

जिल्ह्यातील घरकुलांची सद्यस्थिती

  • पंतप्रधान आवास योजनेतील एकूण मंजूर घरकुले ---- ८९२५

  • शबरी आवास योजना घरकुले ---- ३४८

  • रमाई आवास योजना ---- २८४

  • पारधी आवास योजना ---- १९

  • सन २०२१-२२ मधील एकूण उद्दिष्ट ---- २०८०

  • उद्दिष्टापैकी मंजुर घरकुले ---- १०१४

  • मार्च २०२१ अखेर अपूर्ण असलेली ---- ६९२३

  • अपूर्णपैकी आजअखेर पूर्ण झालेली ---- २७७६

  • एकूण मंजूर घरकुलांपैकी जागा नसलेले ---- ३४९९

  • जागा नसलेल्यांपैकी जागा उपलब्ध झालेले ---- २००५

  • सध्या जागा नसलेली ---- १४९४

पुणे जिल्ह्यातील बेघरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी विविध घरकुल योजनांची अंमलबजावणी केली जाते. मात्र घरकुल मंजूर होऊनही जागेविना ती पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जागा नसलेल्या घरकुलांना जागा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात जागा शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत चांगले यश मिळाले आहे.

-आयुष प्रसाद, प्रशासक, जिल्हा परिषद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com