'अंतिम'च्या गुरूवारी रद्द केलेल्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच; पुणे विद्यापीठानं केलं जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

हवामानशास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य झाले नसते. तसेच वीज पुरवठा खंडित अथवा इंटरनेट सेवेत अडचणी आल्या असत्या.

पुणे : राज्यातील अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या गुरुवारी (ता.१५) होणाऱ्या सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रसिद्ध केले आहे. गुरूवारी रद्द केलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.

Pune Rain : २५ सप्टेंबरची पुनरावृती टळली; यंदा जास्त पाऊस होऊनही नुकसान कमीच​

पुणे आणि परिसराबरोबरच विविध ठिकाणी बुधवारी (ता.१४) सायंकाळी आणि रात्री जोरदार पाऊस झाला. तसेच हवामानशास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य झाले नसते. तसेच वीज पुरवठा खंडित अथवा इंटरनेट सेवेत अडचणी आल्या असत्या. हे लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने गुरूवारी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची तब्बल ३३८ विषयांची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे विद्यापीठाने संकेतस्थळावर स्पष्ट केले.

भारताला पहिला 'ऑस्कर' मिळवून देणाऱ्या कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांचे निधन​

विद्यापीठाने गुरूवारी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कळविल्याची माहिती प्रशासनाने दिली.

विद्यापीठातर्फे शुक्रवारी (ता.१६) २५८ विषयांची परीक्षा घेतली जाणार असून जवळपास ८० हजार विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University declared revised schedule of final year exams canceled on Thursday will be announced soon