पुणे विद्यापीठाकडून सहा जणांना "जीवनसाधना गौरव पुररस्कार'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

  • पोपटराव पवार, नरेंद्र जाधव, एस.के. जैन, राहिबाई पोपेरे, गिरीश प्रभुणे, विनोद शहा यांचा समावेश

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या "जीवनसाधना गौरव पुरस्कारां'ची आज घोषणा करण्यात आली. ग्रामविकास क्षेत्रात भरीव कार्य करणारे पोपटराव पवार, बीजांच्या स्थानिक प्रजातींचे जतन करणाऱ्या राहिबाई पोपेरे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, भटक्‍या-विमुक्तांच्या विकासासाठी कार्यरत असलेले गिरीश प्रभुणे, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन आणि जनसेवा फाउंडेशनचे डॉ. विनोद शहा यांचा सन्मानीत केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठाचा 10 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून, या कार्यक्रमात या मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार यावाचा केलेला गावाचा कायापालट केला. हिरवेबाजारचा आदर्शन घेऊन महाराष्ट्रात ग्रासुधारणेची चळवळ रूजली. त्यांना केंद्र शासनातर्फे नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

राहिबाई पोपेरे यांनी अकोले तालुक्‍यातील आदिवासी भागात स्थानिक दूर्मीळ बिया जतन करण्याचे मोठे कार्य केले. त्यामुळे त्यांची "सीड मदर' ओळख निर्माण झाली. त्यांनाही नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. नरेंद्र जाधव हे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय संस्थांवर त्यांनी काम केले आहे. गिरीश प्रभुणे हे गेले अनेक वर्ष भटक्‍या विमुक्‍तांच्या उन्नतीसाठी स्वताःला वाहून घेतले आहे. "पुनरुत्थान समरसता गुरुकुलम' या संस्थेच्या माध्यमातून ते हे कार्य करतात.

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

ऍड. एस. के. जैन यांचे सामाजिक व शैक्षणीक कार्यात मोठा सहभाग आहे. निरामय ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. डॉ. विनोद शहा यांनी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघासाठीही जनसेवा फाउंडेशनतर्फे विविध मोहिमा राबवल्या जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University honors six people with lifetime achievement award