Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

१०० दिवसांपासून निकाल रखडल्याने भाषा भवनातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिष्यवृत्ती व ‘कमवा व शिका’ योजना ठप्प; परीक्षा विभागाच्या दिरंगाईविरोधात १४ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी
SPPU students await results even after 100 days

SPPU students await results even after 100 days

Sakal

Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या दिरंगाईचा फटका पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना बसला आहे. भाषा भवनातील (खेर वाङ्मय भवन) प्रथम वर्ष (द्वितीय सत्र) मे २०२६ च्या परीक्षेचा निकाल १०० दिवस उलटूनही जाहीर झालेला नाही. नियमानुसार परीक्षा संपल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल लावणे बंधनकारक असताना झालेल्या या विलंबाविरोधात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या १४ सप्टेंबरपासून परीक्षा विभागासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com