esakal | पुण्यात विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी

बोलून बातमी शोधा

Pune unseasonal Rain In Pune On First DAy Of Weekend Lockdown

आठवडाभर दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहणार; हवामान खात्याचा अंदाज 

पुण्यात विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  ः शहरात विकेंड लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. दिवसभर वातावरण ढगाळ होते तर दुपारी चार नंतर शहर आणि उपनगरात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील आठवडाभर तरी शहरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

दुपारनंतर मुख्य शहरासह पौड फाटा, सिंहगड रस्ता, रामटेकडी, पूर्व उपनगरे, मुंढवा, केशवनगर, खराडी आदी भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. राज्यात बुधवार (ता. १४ ) पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस, तसेच जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हे वाचा - पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत!

विदर्भ ते दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. तो आता दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश व लगतच्या भागापर्यंत सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झा असून पुढील काही दिवस अशीच स्थिती असेल. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद झाली.

हे वाचा - पिंपरीत 4 हजार 800चं रेमडेसिव्हीर 11 हजारांना; चौघांना अटक