पिंपरीत वाहनांची तोडफोड; गाडी पार्क करण्याच्या कारणावरून गोंधळ

Pune : Vehicle vandalism session continues in Pimpri
Pune : Vehicle vandalism session continues in Pimpri

पिंपरी : पिंपरीतील खराळवाडी येथे टोळक्‍याने दोन टेम्पोसह एका मोटारीची तोडफोड केली. यासह टोळक्‍याने परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

गाडी पार्क करण्याच्या कारणावरून शुक्रवारी (ता. 6) रात्री काही जणांमध्ये भांडणे झाली होती. अशातच एका वाहनाचा दुसऱ्या वाहनाला धक्का लागला. या कारणावरून एका टोळक्‍याने गोंधळ घालत खराळवाडी परिसरातील दोन छोटे टेम्पो व एका मोटारीची तोडफोड केली. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले.

नपुंसक असल्याची माहिती पत्नीपासून लपविली अन्

पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांची तोडफोड करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेकदा केवळ दहशत माजविण्यासाठी टोळके रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारींना लक्ष्य करत असल्याचे दिसून येते. वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे नागरिकही भितीच्या छायेत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com