

Pune Weather Forecast Cyclone Impact Triggers Rain In Pune Temperature Falls Sharply As IMD Warns Of Two Days Of Rain
esakal
-प्रज्वल रामटेके
पुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळ ‘मुरासू’ आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे पुणे शहर आणि परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्रीपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात एकाच दिवशी आठ अंश सेल्सिअसने घट झाली. सोमवारी (ता. २) सकाळीही शहराच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. तर पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.