पुणेकरांनो, पुण्यात पाऊस होणार कमी कारण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

पुणे : क्यार हे तीव्र चक्रीवादळ आज दुपारी कोकण किनाऱ्याच्या जवळून जाणार आहे. हे चक्रीवादळ आता ओमानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील बाष्पाचे प्रमाण आज संध्याकाळनंतर कमी होईल. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कमी होणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

दिवाळीमध्ये पाऊस जाणार सुटीवर

‘क्‍यार’ या चक्रीवादळाचा प्रभाव सध्या शहरावर जाणवत असल्याने शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सध्या शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे आलेले बाष्प सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आकाशात दिसत आहे. त्यामुळे पुण्यात पाऊस पडत आहे. मात्र, आज क्यार चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकरणार आहे त्यानंतर पुण्यातील पावसाचे वातावरण कमी होईल.

क्‍यार चक्रीवादळाची तीव्रता वाढणार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune will receive less rainfall cause Hurricane is going towards Oman