पुणे : केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या; खासगीकरण थांबवा

विविध पक्षांची मागणी, मंडईत केले आंदोलन
पुणे : केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या; खासगीकरण थांबवा
पुणे : केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या; खासगीकरण थांबवाsakal

पुणे : केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या, विविध सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण थांबवा, बेरोजगारीला आळा घाला, रेल्वे-विमानतळ-बँका- एलआयसी अशा सार्वजनिक संपत्तीची विक्री करू नका अशा विविध मागण्यांसाठी आज विविध पक्षांनी आज मंडर्इत आंदोलन केले.

किसान संयुक्त मोर्चाने आज भारत बंदची हाक दिली आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, आम आदमी पक्ष, जनता दल धर्मनिरपेक्ष, शिवसेना यासह विविध पक्षांचे शहर प्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. आंदोलन सहभागी पक्ष आणि अंगमेहनती कष्टकरी संघटना, लोकायत, विविध कामगार संघटना, दगडखाण कामगार संघटना आदी संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे.

पुणे : केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या; खासगीकरण थांबवा
लॉकडाऊनमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं, धक्कादायक आकडेवारी आली समोर

ये हिटलर के साथी, धरतीची आम्ही लेकरे, सांगा धनाचा साठा अन आमचा वाटा कुठ हाय? हो या लोकायतच्या कला पथकाने सादर केलेल्या प्रेरणा गीतांनी आंदोलनकर्त्यांमध्ये जोश भरला. डोक्यावर मोळी घेतलेल्या शेतमजूर स्त्रिया आणि विविध पक्षांचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी प्रस्तावना केली. मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अभय छाजेड यांनी भूमिका मांडली. स्वप्नील फुसे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन गाडे यांनी आभार मानले.

मोदी सरकारला सवाल करण्यास असंतोष प्रकट सभा :

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल करीत आंदोलनानंतर असंतोष प्रकट सभा घेण्यात आली.सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे गजानन थरकुडे व बाळासाहेब भांड, जनता दल धर्मनिरपेक्षचे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दंत, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ॲड. नाथा शिंगाडे, भारतीय साम्यवादी पक्षाचे अरविंद जक्का, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक प्रा. अजित अभ्यंकर, स्त्री मुक्ती समितीच्या मेधा थत्ते, लोकायतचे नीरज जैन व अलका जोशी, बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे शिरीष राणे यांनी सभेत मार्गदर्शन केले. हमाल पंचायत, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, मोलकरीण संघटना, रिक्षा पंचायत आदी संघटनांचे कार्यकर्ते सभेत सहभागी झाले होते.

बंदला संमिश्र प्रतिसाद :

किसान मोर्चाने केलेल्या बंदच्या आवाहनाला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुण्यातील मुख्य घाऊक धान्य बाजार, भाजीपाला आणि फळे बाजार येथे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी पेठाही अंशतः बंद होत्या. रिक्षाचालकांनी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत रिक्षा बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला. मात्र इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com